Chandrapur : भावाच्या मृत्यूस डॉ. झाडे जबाबदार, अहिरांची पोलिसांत तक्रार; राजकीय वळण मिळणार?

Hansaraj Ahir : या तक्रारीमुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Hansaraj Ahir and Dr. Zade
Hansaraj Ahir and Dr. ZadeSarkarnama

Chandrapur News : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे धाकटे भाऊ हितेंद्र अहीर यांचा उपचारादरम्यान चंद्रपुरात डॉ. विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात एका महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर आज त्यांनी आपल्या भावाच्या मृत्यूला डॉ. झाडेंना जबाबदार धरले आहे.

डॉ. झाडेंच्या विरोधात स्वतः अहीर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिस यंत्रणा सक्रीय झाली आणि डॉ. झाडे यांची चौकशी सुरू केली. या तक्रारीमुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपुरातील जयंत टॉकीजच्या मागे डॉ. विश्वास झाडे यांचे रुग्णालय आहे. ते हदयरोग तज्ज्ञ म्हणून परिचित आहेl.

१२ जानेवारीला हितेंद्र अहीर यांना हदयविकाराचा धक्का आला. त्यांना तत्काळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास झाडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटत आहे. त्यानंतर आज स्वतः अहिर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे हिंतेद्र यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.

डॉ. झाडे यांच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाला, असा अहीरांच्या तक्रारीचा सुर आहे, असे चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. अहीर यांची तक्रार प्राप्त होताच पोलिस यंत्रणा कामाला लागली. डॉ. झाडे यांच्या रुग्णालयात दुपारी पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी पोहोचले. त्यांचे बयाण नोंदविले. कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर पुन्हा त्यांना बयाणासाठी रात्री पोलिसांनी बोलाविले.

Hansaraj Ahir and Dr. Zade
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर जिल्हाध्यक्षांवर का चिडले ?

अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तपासअंती गुन्हा दाखल करायचा की नाही, हे ठरवू, असे पोलिस (Police) तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. झाडे सन-२०१९ ची बल्लारपूर विधानसभा निवडणूक (Election) कॉंग्रेसकडून लढले होते. त्यापूर्वी ते कोणत्याही पक्षात नव्हते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवाराला मदत केली. आता ते कॉंग्रेस पक्षात आहेत. त्यामुळे अहीर यांच्या तक्रारीनंतर याला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

हितेंद्र यांच्या मृत्यूला डॉ. झाडेच जबाबदार होते, तर हंसराज अहिर (Hansaraj Ahir) यांनी तक्रार करण्यास येवढा उशीर का केला, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. हितेंद्र अहीर यांना आणले ते गंभीर अवस्थेत होते. केवळ पाच मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. यात माझी चूक नाही, असे डॉ. झाडे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com