चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ५ वर्षांपासून सुरू होती विना निविदा ९५ लाखांची ‘धुलाई’

वस्त्र धुण्यासाठी या संस्थेने चार धोब्यांना 'पेटी कॉन्ट्र्क्ट' दिला आहे. प्रत्येकी १५ हजार रूपयांत Fifteen Thousand Rupees या चारही जणाकडून कपडे धुऊन घेतल्या जाते.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ५ वर्षांपासून सुरू होती विना निविदा ९५ लाखांची ‘धुलाई’
Chandrapur Medical College and HospitalSarkarnama

चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णांचे वस्त्र धुण्यासाठी मागील पाच वर्षांत तब्बल ९५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. धुलाईच्या कामात शासकीय नियमांना पायदळी तुडविण्यात आले. यासाठी ई-निविदेलाच बगल दिली गेली. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून या ‘वस्त्रोद्योगा’त हात चांगलेच ओले केल्याची चर्चा आहे.

सन २०१७ पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त होते. त्यावेळी सन २०१६ मध्ये रुग्णालयातील वस्त्र धुण्याचे कंत्राट साई बहुउद्देशीय विकास संस्था चंद्रपूर यांना मिळाले. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील अटी व शर्तींनुसार कंत्राटदाराला काम करणे बंधनकारक होते. त्यानंतर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनिस्त आले. तेव्हा नवी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी साई बहुउद्देशीय विकास संस्थेचे वस्त्र धुलाईचे कंत्राट चार डिसेंबर २०१७ रोजी खंडीत केले.

नवी निविदा प्रक्रियेला विलंब होईल. या काळात वस्त्रधुलाईचे काम प्रभावित होईल. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या कारणामुळे पाच दिवसानंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी तात्पुरत्या स्वरूपात जुन्या अटी शर्तीच्या आधारे वस्त्र धुण्याचे याच संस्थेला देण्यात आले. मात्र काम देताना चंद्रपूर संस्थास्तरावर ई-निविदा पूर्ण होईपर्यंतच ही सेवा या संस्थेकडून घेतली जाईल, असा स्पष्ट उल्लेख आहे. दोन महिन्यात ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु पाच वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा वस्त्र धुण्याच्या नव्या कंत्राटासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. नियमबाह्य रित्या याच संस्थेकडे हे काम आजपर्यंत ठेवण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांची भागीदारी, मधला दोन वर्षांचा कोरोनाचा काळ यामुळे या कामाची कुठेही वाच्यता झाली नाही. आता माहितीच्या अधिकारात शासकीय महाविद्यालयातील हा लाखो रुपयांचा धुलाईचा गोरखधंदा समोर आला. विशेष म्हणजे सन २०१७ ते आत्तापर्यंत ४६ देयकांचे तब्बल ९५ लाख १३ हजार ८३६ रुपये या संस्थेकडे वळते करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ही संस्था स्वतः काम करत नाही. रुग्णालयातील कपडे धुतांना निजंर्तुक करणे आवश्यक असते. विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. परंतु वस्त्र धुण्यासाठी या संस्थेने चार धोब्यांना 'पेटी कॉन्ट्र्क्ट' दिला आहे. प्रत्येकी १५ हजार रूपयांत या चारही जणाकडून कपडे धुऊन घेतल्या जाते.

Chandrapur Medical College and Hospital
चंद्रपूर महानगर पालिकेत टक्केवारी, भागीदारी आणि दादागिरी...

महिन्याला ६० हजार रुपयांत रुग्णालयातील वस्त्रांची धुलाई ही संस्था करते. देयक मात्र लाखो रुपयांची उचलते. कोणताही आदेश नसताना या कंत्राटदाराची देयक नेमकी दिलीच कशी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय राठोड यांनी कानावर हात ठेवले. आपण यावर बोलू शकत नाही. तो अधिकार अधिष्ठाता यांचा आहे, असे सांगून वेळ मारून नेली. शासनाच्या नियमाप्रमाणे ई-निविदा प्रक्रियेशिवाय कोणतेही काम देण्याची तरतूद नाही. आपत्कालीन परिस्थितीत एक-दोन महिन्यांसाठी देऊन निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. मात्र चंद्रपूर शासकीय महाविद्यालयात तब्बल पाच वर्ष एकाच कंत्राटदाराकडून कपडे धुण्याची ‘किमया’ तत्कालीन अधिष्ठाता यांनी केली. त्याच किमयेला पुढे नेण्याचे काम विद्यमान अधिष्ठाता करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in