Chandrakant Khaire News: खैरे म्हणाले, अहीरांच्या पराभवाला मुनगंटीवार जबाबदार !

Hansaraj Ahir : अहीरांचा पराभव मुनगंटीवार यांच्यामुळे झाला. याचा ठोस पुरावा नाही.
Chandrakant Khaire and Hansaraj Ahir.
Chandrakant Khaire and Hansaraj Ahir.Sarkarnama

Chandrapur News: लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवाला भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर हंसराज अहीर यांच्या पराभवाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदार आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज केला.

शिवगर्जना यात्रेनिमित्ताने ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. स्थानिक विश्रामगृहात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्याशी त्यांची भेट झाली. अहीरांचा पराभव मुनगंटीवार यांच्यामुळे झाला. याचा ठोस पुरावा नाही. मात्र ही कार्यकर्त्यांची भावना आहे, असे खैरे म्हणाले.

राज्यात भाजपने पैशाच्या बळावर फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. यांचे गंभीर परिणाम भविष्यात भाजपला भोगावे लागतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मराठी माणसाला न्याय देण्याचे काम केले. बाबरी मशीदीचा ढाचा पाडला. तेव्हा भाजपने अंग झटकले होते. त्यानंतर त्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे.

अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अप्रतिम काम झाले. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी धोका दिला. प्रचंड खोक्यांचा वापर पक्ष फोडण्यासाठी झाला आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जातात, असे खैरे म्हणाले. हा सगळा प्रकार राज्य शासन पुरस्कृत आहे. यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. एखाद्या पक्ष फोडण्याचे नीच काम फडणवीस यांनी केले आहे.

Chandrakant Khaire and Hansaraj Ahir.
Chandrakant Khaire News: ओवेसींकडे जायला आम्ही लाचार नाही, बावनकुळेंनी सांभाळून बोलावं !

या मिंधे सरकाराचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी ही शिवगर्जना यात्रा आहे. याला लोकांचा आणि शिवसैनिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असा दावा खैरे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे (Shivsena) जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, संपर्क प्रमुख प्रशांत कदम, युवा सेनेचे शरद कोळी, शिल्पा बोडखे उपस्थित होत्या.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि हंसराज अहीर यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अहीरांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्याकडून सोशल मिडियावर पोस्ट करून खदखद व्यक्त करण्यात आली होती. मुनगंटीवारांमुळे अहीरांचा पराभव झाला, याचे पुरावे तेव्हाही नव्हते अन् आजही नाहीत. ही अहीरांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आज माजी खासदार खैरे (Chandrakant Khaire) दौऱ्यावर असताना अहीरांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याजवळ तेच दुखणे व्यक्त केले. यासंदर्भात हंसराज अहीर यांच्याशी संपर्क साधला असता, 'या विषयावर मी सध्याच बोलणार नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com