Chandrapur Congress News : खासदारांची मृत्यूशी झुंज, अन् जिल्हाध्यक्षपदावर नियुक्तीची चर्चा !

MP Balu Dhanorkar : खासदार धानोरकरांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत.
MP Balu Dhanorkar
MP Balu DhanorkarSarkarnama

MP Balu Dhanorkar is battling death : कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हजारो कॉंग्रेस कार्यकर्ते खासदार धानोरकरांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मात्र अशावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी झालेली नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे. (MLA Subhash Dhote was appointed as rural district president (in-charge))

खासदार धानोरकरांची प्रकृती चिंताजनक असतानाच आज सोमवारी (ता. २९) कॉंग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी (प्रभारी) आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती करण्यात आली. धानोरकर समर्थक तिवारी यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी युती केली होती. विजयानंतर या दोघांनीही आनंदोत्सवात नृत्य केले. याची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केल्यानंतर देवतळे यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते.

दरम्यान देवतळे यांची जबाबदारी शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे सोपविली होती. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार झाला. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. नोकरीसाठी सहा लाख रुपये रावत यांना दिले. ते परत केले नाही, म्हणून गोळीबार केल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली.

याप्रकरणात बॅंकेच्या एका संचालकाचीसुध्दा पोलिसांनी चौकशी केली होती. बॅंकेतील नोकर भरतीला दोन वेळा स्थगिती देण्यात आली. या काळात काही संचालकांनी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकडून पैसे घेतल्याचाही आरोप केला गेला. त्यामुळे या संचालकांची नार्को चाचणी करण्याची मागणी कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी केली. त्यानंतर बॅंकेतील रावत समर्थक संचालक आणि आमदार सुभाष धोटे यांनी तिवारी यांना पदावरून काढा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती.

MP Balu Dhanorkar
पुणे लोकसभेच्या जागेसाठी Congress - NCP मध्ये रस्सीखेच | Pune Loksabha by-poll election | Sarkarnama

आता मागील तीन दिवसांपासून खासदार धानोरकरांवर (Balu Dhanorkar) उपचार सुरू आहेत. त्यांना काल रविवारी (ता. २८) तातडीने दिल्ली (Delhi) येथे हालविण्यात आले. आज (ता. २९) सकाळी त्यांच्या मृत्यूच्या अफवासुद्धा पसरविण्यात आल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Chandrapur) जिल्हाभरातील (Congress) काॅंग्रेसचे कार्यकर्ते खासदार धानोरकरांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करीत आहेत. दुसरीकडे रामू तिवारी यांची पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी आमदार धोटेंना नियुक्त करण्यात आले आहे. याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

काॅंग्रेस पक्षात अशा नियुक्त्या करताना चर्चा, विचारविमर्श केला जातो. त्यानंतरच नियुक्त्या केल्या जातात. बाळू धानोरकर यांची प्रकृती परवा-परवा बिघडली. त्यामुळे ते मृत्यूशी झुंज देत असताना जाणीवपूर्वक ही नियुक्ती करण्यात आली नसावी, असेही काहींचे मत आहे. पण धानोरकरांच्या प्रकृतीची जशी चर्चा सुरू आहे, तशीच या नियुक्तीचीही चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com