Dr. Mangesh Gulwade and Devrao Bhongale.
Dr. Mangesh Gulwade and Devrao Bhongale.Sarkarnama

Chandrapur BJP : काॅंग्रेसनंतर भाजपमध्येही बदलचे वारे, भोंगळे, डॉ. गुलवाडेंचे अध्यक्षपद अधांतरी !

BJP : जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Winds of change in BJP too at Chandrapur : प्रदेश भाजपमध्ये नवी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील पाच वर्षांपासून देवराव भोंगळे भाजपचे ग्रामीण आणि डॉ. मंगेश गुलवाडे शहरअध्यक्ष आहेत. या दोघांबाबत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य समाधानी आहेत काय, याची चाचपणी आज शनिवारी (ता. ६ मे) करण्यात आली. (State General Minister Muralidhar Mohod came to Chandrapur today)

प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोड आज चंद्रपुरात आले होते. त्यांनी वैयक्तिकरीत्या विद्यमान ग्रामीण आणि शहर अध्यक्षांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. नुकताच कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना भाजपशी युती केली म्हणून पदावरून काढून टाकले. आता त्यानंतर भाजपमध्ये बदलाचे वारे सुरू झाले आहेत.

चंद्रपूर जिल्हा भाजपमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेच आजवर वर्चस्व राहिले आहे. शहरअध्यक्ष डॉ. गुलवाडे आणि ग्रामीण अध्यक्ष भोंगळे मुनगंटीवार त्यांच्या खास मर्जीतील आहेत. डॉ. गुलवाडे यांना राजकारणाचा गंध नसतानाही अनेकांचा विरोध पत्करून त्यांना शहराध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासून त्यांच्याविषयी भाजपच्या एका गोटात नेहमी रोष राहिला आहे.

ग्रामीणचे अध्यक्ष भोंगळे यांचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्याशी फारसे सख्य नाही. चिमुरचे आमदार बंटी भांगडियासुद्धा भोंगळे यांच्यापासून अंतर ठेवून राहतात. राजुऱ्याचे भाजपचे आमदार अॅड. संजय धोटे सुद्धा भोंगळे यांना विधानसभेचा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून पाण्यात पाहतात. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी कार्यकारिणी जाहीर केली. तेव्हाच जिल्हा स्तरावरसुद्धा लवकरच भाकरी फिरवली जाईल, याचे संकेत मिळाले होते.

Dr. Mangesh Gulwade and Devrao Bhongale.
Chandrapur Loksabha : तेव्हा ‘दारू विरुद्ध दूध’च्या मुकाबल्यात दारूचा झाला होता विजय, पण आता...

तेव्हापासून अध्यक्ष आणि शहरअध्यक्ष पदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. भाजपमध्ये गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे. आज प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोड चंद्रपुरात आले. त्यांना भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. प्रत्येकाशी बंदद्वार चर्चा केली.

विद्यमान जिल्हा आणि शहरअध्यक्ष यांच्याबाबत या सदस्यांच्या मनात नेमके काय आहे. त्यांना पुन्हा संधी द्यायची की नव्या नावावर शिक्कामोर्तब करायचे, याची चाचपणी केली. डॉ. गुलवाडे यांच्या विरोधात माजी उपमहापौर राहुल पावडे यांचा गट सक्रीय होता. त्याचे पडसाद महामंत्र्यांसोबतच्या वैयक्तिक बैठकीत उमटले. जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविल्यानंतर नव्या अध्यक्षांची घोषणा केली जाईल. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात आता कॉंग्रेस (Congress) पाठोपाठ भाजपमध्येही (BJP) बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा राजकीय (Political) वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com