चंद्रकांत दादांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेले, ते कोल्हापूरला जायला हवे होते...

चंद्रकांत दादांचे (Chandrakant Patil) औषध चुकीच्या पत्त्यावर गेले, ते कोल्हापूरला जायला हवे होते, असा पलटवार त्यांनी (Nana patole) चंद्रकांत पाटलांवर केला.
Nana Patole and Chandrakant Patil
Nana Patole and Chandrakant PatilSarkarnama

नागपूर : शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. राज्यात सर्व राजकीय पक्षांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. काही निवडणुका झाल्या काही आगामी काळात होणार आहेत. त्यामुळे पुढील काळात पक्ष अधिक अपडेट कसा होईल आणि अधिकाधिक लोक काँग्रेससोबत (Congress) कसे जोडले जातील या संदर्भात आमचं काम सुरू आहे, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी आज सांगितले. ७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात (Maharashtra) डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले. चंद्रकांत दादांचे (Chandrakant Patil) औषध चुकीच्या पत्त्यावर गेले, ते कोल्हापूरला जायला हवे होते, असा पलटवार त्यांनी चंद्रकांत पाटलांवर केला.

आमची ही डिजिटल मेंबरशीप म्हणजे बोगसपणा असणार नाही. कारण मागील काळात मिस कॉल देऊन काही पक्ष जगातले नंबर १ चे पक्ष झाले होते, तसे आम्ही करणार नाही आणि आम्हाला तशी गरजही भासत नाही. आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन, त्यांना कॉंग्रेसचा विचार समजावून सांगून डिजिटल पद्धतीने नोंदणी करणार आहोत. त्याचे टारगेट आमचे ठरलेले आहे. मंत्री आणि संघटनेतील सर्व पदाधिकारी सर्वांनाच आगामी निवडणुकांसाठी जबाबदाऱ्या वाटण्यात येणार असल्याचे पटोले म्हणाले.

नितीन राऊत नाराज नाहीत..

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याबाबत बोलताना नाना म्हणाले, नितीन राऊत काल प्रभारी यांना भेटायला आले होते, त्यांचा कोणताही नाराजीचा सूर आमच्याविरोधात नव्हता. मी गावगुंडाबद्दल बोललो आहे, भाजपवाल्यांना काय आदळ आपट करायची ती करू दे, न्यायालयात तक्रारी करू द्या. न्यायालय जो निर्णय देईल, त्याचा आदर राखू, असे नाना भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा या गावात केलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाले. चंद्रकांत पाटलांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेलंय, ते कोल्हापूरला गेलं पाहिजे होतं, असा पलटवार चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर त्यांनी केला.

Nana Patole and Chandrakant Patil
नाना पटोले पंतप्रधानांबद्दल बोललेले नाहीत, आणि गावगुंड मोदी त्यांनी दाखवला...

न्यायालयाने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये..

न्यायालयाने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये. अगदी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयसुद्धा विधिमंडळाच्या आवारात लागू होणार नाही, असा ठराव मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने घेतला होता. आज मी विधानसभा अध्यक्ष असतो, तर काय केलं असतं, हे देशाला दिसलंच असतं. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत, त्या अधिकारांचा वापर संबंधितांना करू दिला पाहिजे. निवडणूक जवळ येते, तेव्हा तेव्हा भाजपकडून हिंदू मुस्लिम वाद वाढवण्याचे काम केले जाते. भाजप सरकारच्या काळात 53 टक्के बेरोजगारी वाढली आहे. याबद्दल कुणी का बोलत नाही, असा प्रश्‍न पटोलेंनी केला.

फडणवीसांच्या काळातील निर्णय योग्य होते का?

फडणवीसांच्या सरकारमध्ये काही निर्णय घेतले गेले होते. त्यामध्ये बिअर शॉपी रेशनच्या दुकानात सुरू करणे असो वा राज्यात डान्सबार सुरू करणे असो, या निर्णयांचा समावेश होता. मागच्या वेळेस जे निर्णय घेतले होते, तेव्हा असेच घेतले गेले होते का? क तेव्हाही अर्थपूर्ण निर्णय घेतले गेले, असा प्रश्‍न त्यांनी कुणाचेही नाव घेता फडणवीसांना टोला हाणला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com