चाकणकर म्हणाल्या, अर्वधट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी..

अमृता फडणवीस Amruta Fadanvis यांच्या ‘आज वसुली चालू है या बंद’ ला प्रत्युत्तर देताना ‘वहिनींच्या गाण्यात जसा सुरांचा ताळमेळ नसतो, तसा त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो.
Amruta Fadanvis and Rupali Chakankar
Amruta Fadanvis and Rupali ChakankarSarkarnama

नागपूर : लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने मोटारींनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यावर ‘आज वसुली चालू है, या बंद?’, असे खोचक ट्विट विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. त्याला तेवढेच खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.

अमृता फडणवीस यांच्या ‘आज वसुली चालू है या बंद’ ला प्रत्युत्तर देताना ‘वहिनींच्या गाण्यात जसा सुरांचा ताळमेळ नसतो, तसा त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो. संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. अमृता फडणवीस यांचे ट्विट असो किंवा गाणे, दोन्ही चांगलेच गाजत असतात. सोशल मिडियावर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडतो.

‘अमृताचा वेलू गेला तरबूजावरी, गाणे म्हणा २५ वर्ष घरच्या घरी.. महाविकास आघाडी.. मोगरा फुलला’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या तेथेच रुपाली ताई आज संगीताच्या तज्ञ बनल्या आहे, अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या. रुपाली चाकणकर यांची बाजू घेताना काही लोक म्हणतात की, फडणवीसांमध्ये दम असेल, तर त्यांनी उत्तर प्रदेश बंद करून दाखवावा. तर चाकणकरांनी सल्ला देताना ‘ताई तुम्ही कशाला मनावर घेता, वहिनी बॅंकेत आहेत. बॅंकेच्या वसुलीबद्दल त्या बोलत असतील कदाचित. उगीच स्वतःला लावून घेतलं तुम्ही.’ चाकणकरांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे वहिनींनी मारलेला टोला अचूक लागला, असेही ट्विट आले आहे.

Amruta Fadanvis and Rupali Chakankar
CBIने कितीही खळखळाट केला तरी देशमुख  शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर : रुपाली चाकणकर

एकंदरीतच अमृता फडणवीस यांनी ट्विट केल्यानंतर त्याला चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर ट्विटरवर दोन्ही बाजूंनी भरपूर प्रतिक्रिया आल्या. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दिवसभर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या क्रिया आणि त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया यांनीच आजचा दिवस गाजला. महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पडलेल्या सीबीआयच्या छाप्याचीही फारशी चर्चा झाली नाही. मात्र ट्विटरवर आज गाजली ती अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांच्या ट्विट-रिट्विटची जुगलबंदी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com