अनिल देशमुखांचे सीए विशाल खटवानी यांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड..

दोन वाहनांनी सीबीआयची (CBI) टीम कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये देशमुखांच्या (Anil Deshmukh) सीएच्या (CA) कार्यालयात पोहोचली.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

नागपूर : १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. देशमुखांच्या सीएच्या कार्यालयावर आज सकाळी ७ वाजता सीबीआयने धाड घातल्याची माहिती आहे. तब्बल साडेचार तास सीबीआयची कारवाई सुरू होती. विशाल खटवानी, असे त्यांच्या सीएचे नाव आहे.

दोन वाहनांनी सीबीआयची (CBI) टीम कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये देशमुखांच्या (Anil Deshmukh) सीएच्या कार्यालयात पोहोचली. तेथे त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. काही कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतली, तर काही डिजिटल पुरावेही सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे. सकाळी ७ वाजतापासून ११.३० वाजेपर्यत ही कारवाई सुरू होती. सीए (CA) आणि शेअर ट्रेडींगशी संबंधित ही धाड असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणांनी त्यांच्या भोवतीचा फास आणखी आवळला आहे. यापूर्वी त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी व वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबीर सिंह याच्या पत्रानंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Anil Deshmukh
Video:सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही; अनिल देशमुख यांचे इंद्रपालसिंग यांचा दावा

मनी लाँर्डिंग प्रकरणात देशमुख यांचे सहायक कुंदन शिंदे व स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्याविरोधात ईडीने नुकतेच दोषारोपपत्र दाखल केलं आहे. देशमुखांबरोबरच त्यांचे स्वीय साहाय्यक संजीव पालांडे आणि असिस्टंट कुंदन शिंदे यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप आहे. या दोघांवर बार मालकांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com