Nagpur : प्रमुख पक्षांचे उमेदवार गुलदस्त्यातच, कॉंग्रेस आज घोषणा करणार?

Congress : आज रात्री ८ वाजताच्या सुमारास कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे
Nagpur Teachers Constituency Election
Nagpur Teachers Constituency ElectionSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि कॉंग्रेसने अद्यापही उमेदवार घोषित केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत तरी उमेदवार घोषित केला जाईल, अशी अपेक्षा होती. पण तशी घोषणा झालेली नाही.

कॉंग्रेसच्या (Congress) आजच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते पल्लम राजू, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उमेदवाराची घोषणा होईल, अशी चर्चा राणी कोठी परिसरात होती. पण पत्रकार परिषदेतही उमेदवारीबाबत कुणीही काही बोलले नाही. आज रात्री ८ वाजताच्या सुमारास कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत निर्णय होऊन नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केला जाणार असल्याची माहिती आहे. फारच फार उद्या सकाळपर्यंत ही घोषणा होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

कॉंग्रेस भाजपचा उमेदवार घोषित होण्याची वाट बघत आहे, तर भाजप कॉंग्रेसचा उमेदवार घोषित होण्याची वाट बघत आहे. कारण गेल्या वर्षी झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली होती. तो पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता भाजपला जोखीम पत्करायची नाहीये. म्हणून एक-एक पाऊल फुंकून फुंकून टाकले जात आहे. दुसरीकडे पदवीधरच्या विजयाने कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास बळावला आहे आणि पदवीधरसारखीच रणनीती कॉंग्रेसने आखल्याचेही सूत्र सांगतात.

अमरावतीत गुरूवारी भरणार अर्ज..

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून सात जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांपैकी एका नावाची घोषणा गुरुवारी केली जाणार असून लगेच अर्जही दाखल केला जाईल. त्यावेळी मी स्वतः उमेदवारासोबत असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच सांगितलेले आहे. मात्र उमेदवार कोण? हे त्यांनी अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकपूर्व चाचपणीसाठी नाना पटोले काल अमरावतीला गेले होते. पाचही जिल्ह्यांतील काँग्रेसच्या आमदार व पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांनी त्यांची मते जाणून घेतली.

Nagpur Teachers Constituency Election
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी उमेदवार कोण असेल, हे मात्र स्पष्ट केले नव्हते. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार राहणार आहे. पक्षाकडे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, डॉ. सुधीर ढोणे, डॉ. लोढा, भैय्यासाहेब मेटकर, श्याम प्रजापती यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवाराचे नाव १२ जानेवारीला अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहीर केल्या जाईल, असे पटोले यांनी सांगितले. येथे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही दावा केला आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, गतवेळी शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी त्यांना देण्यात आली होती. पदवीधर हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in