NCP : अंतर्गत कलहामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, प्रफुल्ल पटेलांचा दावा !

New Year : नववर्षानिमित्ताने नागपुरात स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Prafull patel with Others
Prafull patel with OthersSarkarnama

NCP's MP Prafull Patel's News : नागपुरात (Nagpur) नुकतेच पार पडलेले अधिवेशन आणि एकंदरीतच या सरकारचा कारभार पाहता, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे वाटत नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. नववर्षानिमित्ताने नागपुरात स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, भाजपच्याच लोकांची काम होत नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून अट्टाहास केला जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये (BJP) मोठा अंतर्गत कलह सुरू आहे. खोके घेऊन आणि डोंगार, झाडीचे दर्शन करून आल्यानंतर स्थापन झालेले हे सरकार लोकप्रिय नाही. त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुक नेतृत्वावर चिडलेले आहे. त्याचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो, असे सांगत प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले.

भाजप आणि शिंदे गटातील मोठा गट सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्याचाच परिणाम म्हणू मंत्रिमंडळ विस्तार आज करतो, उद्या करतो, असे सांगत राहतील आणि विस्तार टाळत राहतील. परंतु ते कधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाहीत, असा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यांनी पक्षातील गटबाजीवरही भाष्य केले. आम्हाला पुढील रांगेत कडक कपडे घालून बसणारे नेते नको आहेत, तर पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत. जे नेते, कार्यकर्ते या कार्यक्रमाला गैरहजर आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचे अधिकार आपल्याकडेच आहेत. कुठलीही सत्ता नसताना अशा प्रकारे रुसवे फुगवे नकोत. एकजुटीने काम करा, अशा कडक शब्दांत पक्षातील गटबाजीवर प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली.

Prafull patel with Others
प्रफुल्ल पटेल तब्बल ४१६ कोटी रुपयांचे मालक पण नावावर एकही गाडी नाही!

देशमुखांना सांगितले की, मान वर करून जा..

एका निलंबित आणि खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपावर देशमुखांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे अतीच झाले. अशा प्रकारचे राजकारण यापूर्वी आम्ही बघितले नव्हते. ते जेव्हा कारागृहातून बाहेर आले, मान खाली घालून नव्हे, तर ताठ मानेने समाजात जावे, असे त्यांना भेटून सांगितल्याचे पटेल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com