'आतापर्यंत दबावतंत्रात होतो, पण... : अविनाश दळवींचा गौप्यस्फोट

Buldhana Politics| Shivena| सामान्य शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना उभी राहली.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama

बुलढाणा : दोन दिवसांपूर्वी शेगाव येथे शिवसेनेचे (Shivsena) तत्कालीन जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन घाटाखालील शिवसेना ही शिंदे गटासोबत असल्याचे जाहीर केले. परंतु त्यांनी सर्व शिवसैनिकांची दिशाभूल केली आहे. त्यांच्या स्वतःच्या तालुक्यातील तालुकाप्रमुख सुद्धा त्यांच्यासोबत गेले नाहीत, असे म्हणत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी यांनी जिल्ह्यातील बंडखोर शांताराम दाणे यांच्यावर निशाणा साधला आहे. बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खऱ्या अर्थाने अशा कठीण समयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्ष वाढीसाठी शिवसैनिकांची गरज आहे. यामुळे शेगावसह,जळगाव जामोद, व संग्रामपूरसह घाटाखालील इतर तालुक्यातील असंख्य निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोबत आहेत व त्यांचे सोबतच राहतील, अशी ग्वाही अविनाश दळवी यांनी दिली.

 Uddhav Thackeray
धक्कादायक...मला ‘ड्रग माफिया’ घोषित करून तुरुंगात टाकणार होते!

यावेळी बोलताना अविनाश दळवी म्हणाले, 'अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये संतनगरी शेगाव येथे सन १९८५ मध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली. तेव्हापासून जनसामान्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलनेही केली. यामुळे आमच्यावर पोलीस केसेससुद्धा झाल्या, तरी आम्ही डगमगलो नाही. नेटाने शिवसेनेची तालुक्यासह परिसरात बांधणी केली. यामुळे मतदारांनी प्रतिसादसुद्धा दिला. नगरसेवक, उपनगराध्यक्ष शिवसेनेचा केला. विधानसभा, लोकसभेत जीवाचे रान करीत शिवसेनेचे काम केले.

सामान्य शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना उभी राहली. शिवसेनेची घोडदौड सुरू असताना काही नेत्यांनी हम करे सो कायदा करीत जुन्या कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी पंख तोडण्याचे काम करून स्वतः ची पोळी शेकून मोठे झाले आणि तेच नेते शिवसेना पक्षाने गठ्ठाभर पदे दिल्यावरही शिवसेना सोडून शिंदे गटात गेले, असे म्हणत त्यांनीखासदार प्रताराव जाधव यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

त्यामुळे खऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. हा काळ कसोटीचा असला तरी हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर चालणारा खरा शिवसैनिक शिवसेनेतच असून शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवत शिवसेनेतच राहणार, असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com