Buldhana news : शिंदे गटाला एकही उमेदवार मिळू देणार नाही; नरेंद्र खेडेकर यांचा इशारा

Shivsena| Buldhana news| 10 टक्केच कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली असून 90 टक्के शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे.
Narendra Khedekar| Shivsena
Narendra Khedekar| ShivsenaSarkarnama

बुलडाणा: सत्ताबदल झाल्यापासून राज्यभरातून शिंदे गटाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढताना दिसत आहे. असे असतानाही बुलडाण्यातील काही निष्ठावंत शिवसैनिक (Shivsena) आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं दिसत आहे. असे असताना बुलडाण्यातील शिवसैनिक मात्र बंडखोर आमदार आणि शिंदे गटात सामील होणाऱ्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

जिल्ह्यातील फक्त 10 टक्केच कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली असून 90 टक्के शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही शिंदे गटाला उमेदवार ही मिळू देणार नाही. असा ठाम निर्धार जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या शेगाव येथील बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी दिली. यामुळे मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरू केल्याचं दिसत आहे.

Narendra Khedekar| Shivsena
Sangali Politics: जयंत पाटील अॅक्शन मोडमध्ये; कोपरा सभेतून मोर्चेबांधणीला सुरुवात

आजच बुलडाणा जिल्हा परिषदेच्या गटांच्या आरक्षणाचं चित्र स्पष्ट झालं असून यामुळे मात्र जिल्ह्यात आगामी निवडणुकीत बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष बघायला मिळू शकतो. आज जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांची शेगाव येथे बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख व असंख्य शिवसैनिक या बैठकीला हजर होते.

गेल्या आठवड्यातही शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला. 'खऱ्या अर्थाने अशा कठीण समयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्ष वाढीसाठी शिवसैनिकांची गरज आहे. यामुळे शेगावसह,जळगाव जामोद, व संग्रामपूरसह घाटाखालील इतर तालुक्यातील असंख्य निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोबत आहेत व त्यांचे सोबतच राहतील,' अशी ग्वाही अविनाश दळवी यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी शेगाव येथे शिवसेनेचे (Shivsena) तत्कालीन जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन घाटाखालील शिवसेना ही शिंदे गटासोबत असल्याचे जाहीर केले. परंतु त्यांनी सर्व शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यांच्या स्वतःच्या तालुक्यातील तालुकाप्रमुख सुद्धा त्यांच्यासोबत गेले नाहीत, असे म्हणत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी यांनी जिल्ह्यातील बंडखोर शांताराम दाणे यांच्यावर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in