मुले चोरणारी समजून तृतीयपंथीयाला मारहाण : सततच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण!

Buldhana News : सोशलमिडीयावर मुले चोरणारी टोळींबाबत अफवा पसरवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
मुले चोरणारी समजून तृतीयपंथीयाला मारहाण : सततच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण!

बुलढाणा : काल (14 सप्टेंबर) उत्तरप्रदेशच्या चार साधूंना मुले चोरणारी टोळी समजून जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सांगलीच्या जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी ही घटना घडली होती. आता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे लहान मुलांना चोरणारी महिला समजून एका तृतीय पंथीयाला जमावाने बेदम मारहाण केली. सायरा नावाची तृतीयपंथीय अकोट येथील फॅशन शो बघून मलकापूरकडे परतत होती. जामोद येथील जुना बस स्टँड परिसरात जमावाने मुले चोरणारी टोळी समजून, या तृतीय पंथीयाला बेदम मारहाण केली. यानंतर तृतीयपंथीयाला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता सायरा नावाची ही तृतीय पंथीय मलकापूर येथील असून, ती अकोट येथून मलकापूरकडे जात असताना हा प्रकार घडला.

आता या तृतीय पंथीयाने जळगाव जामोद पोलिसात तक्रार दिली आहे. मारहाण करणाऱ्या जमावा विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी आतापर्यंत व्हिडिओत दिसणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, इतर मारहाण करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान सायराला बेदम मारहाण केल्यामुळे उपचारांसाठी तिला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुले चोरणारी समजून तृतीयपंथीयाला मारहाण : सततच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण!
Sangli : मुले चोरणारी टोळी समजून साधूंना जबर मारहाण

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तृतीय पंथीयाला जमावाने मारहाण केल्यामुळे, मुले पळवणारी बाई म्हणून तृतीयपंथीयांबद्दल सतत होणाऱ्या गैरसमजाच्या प्रकारामुळे, या घटनेचा तृतीय पंथीयाचे नेते मोगराबाई किन्नर यांनी निषेध केलेला आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील तृतीयपंथीय याचा निषेध करत जळगाव जामोद येथे जमतील व या जमावाला धडा शिकवेल, असाही इशारा तृतीय पंथीय यांचे नेते मोगराबाई किन्नर यांनी दिला आहे.

दरम्यान सोशलमिडीयावर मुले चोरणारी टोळींबाबत अफवा पसरवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातूनच समाजामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. याआधीही मुले चोरणारी टोळी असा गैरसमज होऊन जमावाकडून अनेकदा हल्ला झाला आहे. मारहाण झाली आहे. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com