Budget : राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा अन् विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा अर्थसंकल्प !

Maharashtra : महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग नक्की असेल.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

This budget paves the way for the progress of Maharashtra : राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा, जनतेला आनंद देणारा आणि विरोधकांचा आनंद हिरावणारा, असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, फडणवीस यांनी मांडलेल्या पंचामृत सूत्रानुसार सर्वसामान्यांचा विकास व महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे. अमृत काळाचं हे प्रथम वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारताला विश्वाचे नेतृत्व बनविण्यात महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग नक्की असेल आणि त्या दिशेने नेणारा हा संकल्प आहे.

आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार, उद्योगपती, व्यावसायिक या सर्वच बाबींचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांकरिता महासन्मान योजना, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात भरीव वाढ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन, महिलांसाठी लेक लाडकी योजना निश्चितच दिलासा देणाऱ्या आहेत, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Mungantiwar : मंदिरात जाऊन भजन करणाऱ्यांची संख्या वाढू नये, असं का म्हणाले मुनगंटीवार?

श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास ५०० कोटी रुपये. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील (Maharashtra) ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये. श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण ५० कोटी रुपये. श्री संत गाडगेबाबा समाधिस्थळ, ऋणमोचन विकासासाठी २५ कोटी रुपये. श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी दिला गेला आहे.

प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी. गहिनीनाथ गडाच्या संवर्धन विकासासाठी २५ कोटी रुपये. श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी नागपूर ६ कोटी रुपये. श्री संत जगनाडे महाराज समाधिस्थळ, सुदुंबरे (पुणे) २५ कोटी रुपये अर्थसंकल्पात देण्यात आलेले आहे. राज्य सरकारच्या (State Government) या निर्णयांमुळे धार्मिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in