अर्थसंकल्प केवळ काही नेत्यांपुरता, बाकी केंद्राच्या योजनांचा पुनरुच्चार…

दुष्काळ मुक्तीसाठीच्या सिंचन प्रकल्पांना कोणतीही मदत नाही. उत्तर महाराष्ट्र तर या अर्थसंकल्पात दिसतच नसल्याची टिका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ काही मतदारसंघांपुरता आणि केवळ काही नेत्यांपुरता आहे. बाकी केवळ केंद्राच्या योजनांचा पुनरुच्चार यामध्ये करण्यात आला आहे, अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पावर (Budget) प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, कोविडच्या काळात सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू होऊनसुद्धा पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. सर्वच घटकांची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे. विकास प्रकल्पांच्या बाबतीत कळसूत्री असलेल्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) विकासाची कितीही पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा होणार नाही. शेतकरी, गोरगरीब, ओबीसी, मराठा, धनगर अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसणारा हा मविआचा अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पात विकासाला चालना देण्यात आली नाही, ना कोणत्या कल्याणकारी उपाययोजना करण्यात आल्या. या अर्थसंकल्पातून कोणतीही नवीन दिशा दिली गेली नाही, पुन्हा त्याच त्या घोषणा आणि उर्वरित आमच्या सरकारच्या काळातील योजनांचा गोषवारा त्यात आहे. नवीन म्हणावे असे काहीच नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. दोन वर्षांपूर्वीची 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा आज पुन्हा नव्याने करण्यात आली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती किंवा पीकविमा अशी कोणतीही मदत देण्यात आली नाही.

Devendra Fadanvis
फडणवीस म्हणाले; भाजप संयमी पक्ष, संजय राऊतांनाच अजीर्ण होऊ नये…

इंधन दरांत दिलासा नाही..

केंद्राच्या निर्णयानंतर 22 राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या. पण, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सायकलवरून मोर्चा काढणारे आता कोणता मोर्चा काढणार, असा माझा त्यांना प्रश्‍न असल्याचे फडणवीस म्हणाले.

उत्तर महाराष्ट्र नाहीच..

आमच्या काळातील बळीराजा योजना वगळली, तर विदर्भ आणि मराठवाड्याला कोणतीही नवीन मदत या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली नाही. मराठवाडा ग्रीडची हत्या करण्यात आली. दुष्काळ मुक्तीसाठीच्या सिंचन प्रकल्पांना कोणतीही मदत नाही. उत्तर महाराष्ट्र तर या अर्थसंकल्पात दिसतच नसल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com