राष्ट्रवादीचा बसपला धक्का; नगरसेविकेसह माजी नगरसेवक पतीचा पक्षप्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
BSP corporator Rajlaxmi karangal joins NCP Latest Marathi News
BSP corporator Rajlaxmi karangal joins NCP Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजन समाज पक्षाला धक्का दिला आहे. चंद्रपूर महापालिकेतील पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवक पतीने गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच गायक आनंद शिंदे यांच्या अनेक समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. (NCP Latest Marathi News)

बसपच्या नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल व त्यांचे पती सुधीर कारंगल यांचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वागत केले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण आदी उपस्थित होते. (BSP corporator Rajlaxmi karangal joins NCP)

BSP corporator Rajlaxmi karangal joins NCP Latest Marathi News
भाजपला धक्का; माजी आमदाराच्या नातवासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चंद्रपूर महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपने चमत्कार केला होता. या पक्षाचे आठ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. भाजपने 36 जागा मिळवत सत्ता काबीज केली होती. यावर्षी महापालिकेची निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादीकडून आता इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावले जात आहे.

दरम्यान भाजप नेते गुरूज्योज सिंग यांनीही गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला रामराम ठोकत हातात घड्याळ बांधले. अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. गुरूज्योत सिंग हे मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com