शिंदे गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा; अपमान होत असेल तर दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल

Sanjay Gaikwad News : '...त्यानंतर होणारे परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील'
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSarkarnama

Sanjay Gaikwad News : ''भाजपच्या नेत्यांनी विचार करुन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलायला होवं. असा आपमान सहन केला जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असेल तर एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल. त्यानंतर होणारे परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील'', असा थेट इशारा बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाजपला दिलाय. ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदाराने नाराजी व्यक्त केली आहे.

MLA Sanjay Gaikwad
'तो त्रिवेदी शिवाजी महाराजांबद्दल बोललायं..'; संभाजीराजे फडणवीसांवर भडकले...

आमदार गायकवाड म्हणाले, ''ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहिती नाही, त्यांना या राज्याच्या खुर्चीवर ठेऊन काही उपयोग नाही. या खुर्चीवर मराठी मातीतला माणूस पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविला. अशा महान व्यक्तीबद्दल राज्यपालांनी असं बोलणं योग्य नाही, म्हणून या राज्यपालांना कुठे पाठवायचे तिथे पाठवा'', असं गायकवाड म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भाजपचे (BJP) नेते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्यावरही जोरदार घणाघात केला.

MLA Sanjay Gaikwad
Shivsena : `एक काळी टोपीवाला` असा उल्लेख करत दानवेंची राज्यपालांवर शिवराळ टीका..

दरम्यान, सध्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात वादंग उठलं आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केलं होतं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त केलं. तर भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळे राज्यात सध्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com