बोगस एफडीआर प्रकरण : पाटणचा शाखा व्यवस्थापक निलंबित...

यवतमाळ (Yavatmal) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांनी बॅंकेच्या पाटण येथील शाखा व्यवस्थापकासोबत हातमिळवणी करून १८ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बोगस एफडीआर बनवले.
Yavatmal District Central Co-operative Bank.
Yavatmal District Central Co-operative Bank.Sarkarnama

नागपूर : यवतमाळ (Yavatmal) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांनी बॅंकेच्या (Bank) पाटण येथील शाखा व्यवस्थापकासोबत हातमिळवणी करून १८ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बोगस एफडीआर बनवले. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (Sanjeevreddi Bodkurwar) यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर पाटणच्या शाखा व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशीसुद्धा होणार असल्याची माहिती आहे. पण संचालक येल्टीवार यांच्यावर बॅंकेने अद्याप काही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

शाखा व्यवस्थापक एस.बी.चुक्कलवार यांच्या निलंबन काळात त्याचे मुख्यालय वणी विभागीय कार्यालय असणार आहे. पाटण शाखेचा प्रभार रोखपाल एच. एच. भादीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पाटण शाखेच्या संगणकीय व्यवहाराची चौकशी १६ फेब्रुवारी रोजी केली असता, फक्त १० हजार रुपयांची ठेव स्वीकारली आहे. शाखा व्यवस्थापकांनी सादर केलेली माहिती आणि वास्तविक माहिती यामध्ये तफावत आढळली. त्यामुळे १५.०२.२०२२ ते २४.०२.२०२२ पर्यंतचे मुदती ठेवीचे व्यवहाराची तपासणी सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक आणि उपसरव्यवस्थापक बॅंकींग यांच्यामार्फत करण्यात आली. या तपासणीच्या अहवालानुसार, शाखा स्तरावर चेकबुक, मुदत ठेव पावत्या डिमांड ड्राफ्ट यांची नोंदवही ठेवण्यात आलेली नाही.

महत्वाचे दस्तावेजही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले नाही. शाखेतील मुदत ठेवीच्या पावत्या गहाळ असून त्यावर शाखा व्यवस्थापक किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या सह्या नसल्याचे शाखा व्यवस्थापक यांनी लेखी दिलेले आहे. यामध्ये त्यांना किती पावत्या गहाळ होत्या, याबाबत काहीही माहिती नाही. त्यांनी गहाळ पावत्यांबाबत मुख्य कार्यालय तसेच विभागीय कार्यालयास काहीही कळविलेले नाही. त्यामुळे सेवा नियमांतील तरतुदीनुसार श्रीनिवास भगवान चुक्कलवार यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे बॅंक अध्यक्षांच्या सहीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Yavatmal District Central Co-operative Bank.
'नीट रहा नाहीतर ठोकून काढेन'; भाजप आमदाराचा बॅंक व्यवस्थापकाला दम...

काय आहे प्रकरण ?

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण (ता. झरीजामणी) येथे बँक संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार हे आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून एका कामाचे कंत्राट मिळविण्यासाठी गैरकारभार केला. त्यांच्या खात्यात केवळ १० हजार रुपये होते. पण त्यांनी बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या सोबतीने तब्बल १८ लाख १० हजार रुपयांची बनावट संकल्प मुदत ठेव योजनेच्या पावत्या तयार केल्या. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्या पावत्या सादर केल्या. या पावत्या संगणकावर न करता हाताने तयार करण्यात आल्या आणि तेथेच शंका उपस्थित झाली अन् या प्रकाराचे बिंग फुटले.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ यवतमाळची निविदा कंत्राटदार येल्टीवार यांनी निविदा क्र. २० व २१ नुसार निन्मत्तम निविदा भरली. एखाद्या कंत्राटदाराने निन्मत्तम निविदा भरल्यास त्या निविदेपोटी अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरणे गरजेचे आहे. कंत्राटदार येल्टीवार यांनी स्वतः जिल्हा बँकेचे संचालक असल्याचा गैरफायदा घेत अतिरिक्त सुरक्षा रकमेच्या एकूण १६ बनावट पावत्या बनवल्या आणि त्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सादर केल्या. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी हे बनावट एफडीआर प्रकरण विधानसभेत लावून धरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in