बुलडाण्यात कोट्यावधींचा घोटाळा; पतसंस्थेच्या संचालक मंडळाला अटक

Buldhana | Crime news| गेल्या सात ते आठ वर्षापासून बढे पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळणे बंद झाले होते
Buldhana | Crime news|
Buldhana | Crime news|

बुलडाणा : बुलडाणा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वरणगाव येथुन सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे यांच्यासह संचालक मंडळाला अटक केली. सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेत झालेल्या कोट्यावधींच्या घोटाळा केल्याच्या आरोपाखाली या संचालक मंडळाला अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. चंद्रकांत हरी बढे, राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलीधर पाटील, बळिराम केशव माळी, गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे, भिकू शंकर वंजारी, विजय गणपत वाघ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या राज्यभरात अनेक ठिकाणी शाखा आहेत. त्यामुळे राज्यभरात या पतसंस्थेविरोधात गुन्हे दाखस करण्यात आल्याने पोलिसांनी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. या पतसंस्थेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल लेखापरिक्षकांनी दिला होता.

Buldhana | Crime news|
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना शिवसेनेकडून धोबीपछाड!

सांगलीसह बुलडाणा जिल्ह्यतील असलेल्या शाखेत अपहार झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. तसेच इतर शाखेत सुद्धा अपहार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंद्रकात बढे यांच्यासह तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते... तसेच या घोटाळ्याची सीआयडीकडून चौकशीही सुरू होती. गेल्या सात ते आठ वर्षापासून बढे पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळणे बंद झाले होते. त्यामुळे पतसंस्थेवर शासक नियुक्त करण्यात आले होते. पतसंस्थेतील कार्यकारी अधिकारी मधुसूदन पाटील यांनी देखील अपहाराबाबत तक्रार केलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com