भाजपचा विजयी ‘वसंत’ फुलला; कमळाच्या ‘विजया’ने शिवसेना ‘वंचित’

शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपोकिशन बाजोरीया (Gopikishan Bajoriya) यांना मतविभाजनाचा फटका बसल्याने ३३४ मतांवर समाधान मानावे लागले.
Vanchit Bahujan Aghadi, BJP and Shivsena

Vanchit Bahujan Aghadi, BJP and Shivsena

Sarkarnama

\अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकार मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoriya) यांची विजयी घोडदौड रोखण्यात यश मिळविले आहे. भाजपच्या या विजयाने बाजोरिया यांच्या विजयी चौकार लगावण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले केले. तीन जिल्ह्यांच्या या मतदारसंघात विजयाची रणनिती आखण्यातही भाजप महाविकास आघाडीच्या तुलनेत उजवे ठरले.

शिवसेनेला धक्का देत भाजपने विजयश्री खेचून आणली. महाविकास आघाडीकडून लढलेले शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपोकिशन बाजोरीया यांना मतविभाजनाचा फटका बसल्याने ३३४ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपचे वसंत खंडेलवाल यांना ४४३ मतं मिळाली. विजयाचा चौकार लावण्यात अपयशी ठरलेल्या बाजोरीयांची ‘विकेट’ तब्बल १०९ धावांनी घेत भाजपने विजयाचा ‘वसंत’ फुलविला. भाजपचे संख्या २४६ असल्याने महाविवकास आघाडीची मते फुटल्याने कमळ फुलले असून, वंचित बहुजन आघाडीची भक्कम साथही भाजपला मिळाल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते.

कुरघोडीच्या राजकारणात हुकला विजयी चौकार

शिवसेनेसाठी अकोला, बुलडाणा, वाशीम हा विधान परिषदेचा मतदारसंघ गड मानला जात होता. मात्र, भाजपला मिळालेली मतांची संख्या पाहता महाविकास आघाडीच्या सदस्यांनीही भाजपला मतदान केल्याचे दिसून येते. भाजपची मते २४६, शिवसेना- १३०, काँग्रेस - १९१, राष्ट्रवादी - ९१, वंचित बहुजन आघाडी ८६, एमआयएम सात व इतर सदस्यांची संख्या ७१ होती. महािवकास आघाडीच्या मतदारांची संख्या ४१२ हाेती. मात्र, तरीही महािवकासच्या आघाडीच्या उमेदवाराला ३३४ मतं मिळाली. ते पाहता महाविकास आघाडीसह शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणाने १०० पेक्षा अधिक मतं फुटली व बाजोरियांचा विजयाचा चौकार हुकला.

शिवसेनेच्या पराभवाची कारणे!

- जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी पुढाकार घेत बांधलेली सर्व पक्षीय मोट वंचितच्या जिव्हारी लागली. परिणामी ‘वंचित’ने शिवसेनेला ‘अर्थ’पूर्ण धडा शिकविला.

- विधान परिषद निवडणुकीत वंचितने भाजपला साथ दिल्यास पुढील वर्षी हाेणाऱ्या अकाेला जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने वंचितला पाठिंबा द्यावा या समिकरणावर विधान परिषदेच्या उमेदवारासाठी भाजपने पाठिंबा मिळविला.

<div class="paragraphs"><p>Vanchit Bahujan Aghadi, BJP and Shivsena</p></div>
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेनंतर काँग्रेसचाही पिंपरी पालिकेवर झेंडा फडकावण्याचा निर्धार

- शिवसेनेतील जिल्हा प्रमुख नितीन देशमुख व गोपीकिशन बाजोरिया यांच्यातील गटातटाच्या राजकारणाचा फटका विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला बसला.

.अशी झाली मतमोजणी

- टेबल क्रमांक एक ः अकाेला, मूर्तिजापूर, रिसाेड, लाेणार व नांदुरा येथील केंद्रांवरील १८३ मतांची माेजणी झाली. या टेबलवर भाजपचे वसंत खंडेलवाल यांना ९४ तर शिवसेनेचे गाेपिकिशन बाजाेरीया यांना ८२ मतं मिळाली. सात मतं अवैध ठरली.

- टेबल क्रमांक दोन - अकाेट, बार्शीटाकळी, बुलडाणा, महेकर व मलकापूर येथील केद्रांवरील १७५ मतांची माेजणी झाली. या टेबलावर खंडेलवाल यांना ९० तर बाजाेरीया यांना ७७ मतं मिळाली. आठ मतं अवैध ठरविण्यात आली.

- टेबल क्रमांक तीन- तेल्हारा, वाशीम, चिखली व खामगाव येथील मतदान केंद्रांवर झालेल्या १५० मतांची माेजणी झाली. यात खंडेलवाल यांना ८४ तर बाजाेरीया यांना ५८ मतंच मिळाली. अवैध मतांची संख्या आठ होती.

- टेबल क्रमांक चार - बाळापूूर, कारंजा, देऊळगाव राजा, शेगाव येथील मतदान केंद्रांवर १५० झालेल्या मतांची माेजणी झाली. या ठिकाणी खंडेलवाल यांना १०३ तर बाजाेरीया यांना ४६ मतांवर समाधान मानावे लागले. एक मत अवैध ठरले.

- टेबल क्रमांक पाच - पातूर, मंगरूळपीर, सिंदखेड राजा, जळगाव जामाेद मतदान केंद्रांवर झालेल्या १५० मतांची माेजणी झाली. यात खंडेलवाल यांना ७२ तर बाजाेरीया यांना ७१ मते मिळाली. अवैध मतांची संख्या सात आहे.

‘वंचित’मुळे सारकारला भाजपचा विजय

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे ८५ मतं होती. यातील वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरातील वंचितचे २२ नगरसेवक ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीमध्ये गेले होते. यात उरलेल्या वंचितच्या मतदारांनीही भाजपला मदत केल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे. ‘वंचित’मुळे भाजपचा विजय साकारला तर शिवसेनेला विजयापासून वंचित करीत १८ वर्षांचे या मतदारसंघातील वर्चस्व संपुष्टात आले.

पराभवाचे काय आत्मचिंतन करणार ः बाजोरिया

भाजपचे विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल यांचे अभिनंदन करताना शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांनी नव्या जबाबदारीला वसंत खंडेलवाल न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. सलग १८ वर्षे आमदार म्हणून निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासही ते विसरले नाहीत. विजयाचे चिंतन करावयाचे असते पराभवाचे काय आत्मचिंतन करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जय-पराजय हा ठरलेलाच. आता पुढच्या कामाला लागयचे, असे बाजोरिया म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com