मोठी बातमी : भाजपचा बालेकिल्ल्यातच धुव्वा; फडणवीस-बावनकुळेंच्या जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे यश

नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत एकाही तालुक्यात भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही.
Congress-NCP
Congress-NCPSarkarnama

नागपूर : भारतीय जनता पक्षाला (BJP) बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत एकाही तालुक्यात भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) यश मिळवत भाजपला धोबीपछाड दिली आहे. केवळ दोन पंचायत समित्यांमध्ये भाजपचा उपसभापती निवडून आलेला आहे. (BJP's defeat in Panchayat Samiti chairman-deputy chairman election in Nagpur)

Congress-NCP
पिंपरी भाजपतील निष्ठावंतांना मानाचे पान; खापरे, गोरखेंनतर अनुप मोरेंकडे मोठी जबाबदारी

नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृहजिल्हा आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि नागपूर भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, त्याच बालेकिल्ल्यात भाजपला पंचायत समितीच्या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे. विशेष प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे राजकारण हे ग्रामीण भागात चालते, त्यामुळे हे पराभव त्यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

Congress-NCP
देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान : 'अजितदादा स्वतः अस्वस्थ आहेत'

नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी ९ ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सभापती निवडून आले आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे प्रभाव क्षेत्र असलेले काटोल-नरखेड या दोन तालुक्यात, तसेच हिंगणा पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झालेला आहे. रामटेक तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे शिंदे गटाचा म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा सभापती निवडून आलेला आहे.

Congress-NCP
माझ्या पाठीशी मोदी-शहा-फडणवीसांची ताकद; निवडणुकीत ठाकरेंनाही हरवेन : आमदाराचे खुले आव्हान

नागपूर जिल्ह्यात भाजपला मात्र केवळ दोन पंचायत समित्यांमध्ये यश आलेले आहे, तेही उसभापतीपदाच्या निवडणुकीत. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com