
Vidhan Parishad Selected News : शिक्षक परिषदेने घोषित केलेले उमेदवार नागो गाणार यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून भाजपमध्ये (BJP) एकवाक्यता दिसत नाही. गाणारांशिवाय पर्यायच नाही आणि गाणार १२ वर्ष आमदार राहिलेले आहे. त्यामुळे यावेळी इतरांना संधी द्यावी, असे दोन मतप्रवाह सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे शिर्षस्थ नेत्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ लागत आहे. गेल्या वर्षी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जशी हार पत्करावी लागली, तसे या निवडणुकीत होऊ नये, म्हणून नेते सावध आहे.
समजा गाणार यांना पाठिंबा दिला नाही आणि भाजपने स्वतःचा उमेदवार उभा केला. तर पराभव निश्चित आहे, असे म्हणणारा पदाधिकाऱ्यांचा मोठा वर्ग भाजपमध्ये आहे. त्यामुळे गाणार यांना पाठिंबा दिला नाही आणि दुसरा उमेदवार पुढे केला, तर पदवीधरसारखा निकाल लागू शकतो. पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने (Congress) भाजपच्या उमेदवाराचा पार सफाया करून टाकला होता. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जातीवर मोठ्या प्रमाणात मतदान होते.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ओबीसी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला होता. या निवडणुकीत भाजपला धोता पत्करायचा नाही. त्यामुळेच उमेदवारीबाबचा निर्णय अद्याप राखून ठेवला असल्याचे बोलले जात आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आत्ता कुठे अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाली आहे. उमेदवारीसंदर्भात कालच आमची बैठक झाली. त्यामुळे आता लवकरच उमेवार कोण, याचा निर्णय होणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
१२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. आम्ही अर्ज दाखल करू तेव्हा कळेलच की उमेदवार कोण आहे, असे सांगून त्यांनी उमेदवाराचे नाव गुलदस्त्यातच ठेवले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागो गाणार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, हे खरे आहे आणि भारतीय जनता पक्ष ही निवडणूक कधीच लढत नाही. आम्ही उमेदवाराला पाठिंबा देत असतो. पाठींब्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. कालच्या बैठकीला सर्व जिल्ह्यांतील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि आमचे शिर्षस्थ नेते उपस्थित होते, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.
आमचे सर्व पदाधिकारी आणि नेतृत्वाने मांडलेले सर्व विषय पार्लामेंट्री बोर्डापुढे ठेवले जातील आणि त्यानंतर पाठिंबा कुणाला द्यायचा, याबाबतचा निर्णय होईल. शिक्षक परिषदेने नागो गाणार यांची उमेदवारी जाहिर केली. आता त्यांना समर्थन द्यायचे की नाही, येवढाच विषय शिल्लक आहे. आज किंवा फारच फार उद्यापर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
गाणार यांना पाठिंबा द्यायचा किंवा नाही, याबाबत भाजपने त्यांच्याच पदाधिकाऱ्यांची उत्सुकता ताणली आहे. गाणार १२ वर्ष या मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा तेच नको, तर इतरांना संधी द्यावी, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यांचा विरोध होऊ नये, म्हणून शिर्षस्थ नेते एक-एक पाऊन फुंकून फुंकून टाकत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.