भाजप आता ‘त्या’ पाच गद्दारांना सोडणार नाही, दाखल केली याचिका...

भाजपकडून (BJP) त्या बंडखोर सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यात जिल्हा परिषदेचे (ZP) उपाध्यक्ष संदीप ताले, बंडू बनकर, दिलीप सार्वे, धुरपता मेहर, उमेश पाटील या फुटीर सदस्यांचा समावेश आहे.
Bhandara ZP
Bhandara ZPSarkarnama

भंडारा : भारतीय जनता पक्षाने जारी केलेला व्हीप झुगारून भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबत बंडखोरी करत काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणाऱ्या ५ बंडखोर सदस्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरांमुळे हार पत्करावी लागली. याचा वचपा भाजप काढणार आहे.

भाजपकडून (BJP) त्या बंडखोर सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यात जिल्हा परिषदेचे (ZP) उपाध्यक्ष संदीप ताले, बंडू बनकर, दिलीप सार्वे, धुरपता मेहर, उमेश पाटील या फुटीर सदस्यांचा समावेश आहे. पक्षाच्या विरोधात जाऊन काँग्रेसला मदत केली, त्यामुळे या पाचही जणांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. १० मे रोजी भंडारा (Bhandara) जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ५२ पैकी बहुमतासाठी २७ हा जादूई आकडा पार करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. दरम्यान सर्वाधिक २१ सदस्य निवडून आणलेल्या काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते. असे असताना भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील ५ जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाचा व्हीप झुगारून काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करीत उपाध्यक्षपद मिळविले. भाजपचा गट स्थापन झालेला असताना या ५ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोरी करून सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला मदत करणाऱ्या फुटीर माजी आमदार व त्यांच्या सर्व सदस्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निष्कासीत केले.

Bhandara ZP
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

भाजपच्या निवडून आणलेल्या या सर्व सदस्यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी याचिका भाजपच्यावतीने ॲड. राहुल देवगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. तर दुसरीकडे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान सभागृहातच भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलाच राडा झाल्याने या प्रकरणी महिला सदस्यांच्या तक्रारीवरून फुटीर गटातील उपाध्यक्षांसह तिघांविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तर उपाध्यक्ष संदीप ताले यांच्या तक्रारीवरून धक्काबुक्की आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मूळ गटातील सदस्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे याचिका दाखल केली असल्याने आता या याचिकेवर जिल्हाधिकारी लवकरच पाचही सदस्यांना नोटीस बजावणार आहेत. पाचही जणांचे सदस्यत्व रद्द होणार का, याकडे संपूर्ण जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com