भाजप लढणार उपाध्यक्ष पदाची निवडणूक, नितीन गडकरी घेणार निर्णय...

आता नव्याने गट नेत्याची निवड भाजपकडून करण्यात येणार आहे. गट नेत्यासाठी उपगट नेते व्यंकट कारेमोरे, आतिश उमरे, कैलास बरबटे Atish Umare and Kailas Barbate यांच्या नावांची चर्चा आहे.
भाजप लढणार उपाध्यक्ष पदाची निवडणूक, नितीन गडकरी घेणार निर्णय...
Sunil Kedar and Nitin GadkariSarkarnama

नागपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक झाली. यामध्ये कॉंग्रेसने पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळवले. तर भाजपला नुकसान सोसावे लागले. आता उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा निर्णय होणार आहे. केदार यांनी जिल्ह्याच्या राजकारणार आपली पकड मजबूत केली आहे आणि स्वतः गडकरी या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याने ही निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते निवडीबाबत काल भाजपची बैठक झाली. नेत्यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात विरोधी पक्ष कोण, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते व भाजपच गट नेते अनिल निधान यांचे सदस्यत्व रद्द झाले. पोट निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता नव्याने गट नेत्याची निवड भाजपकडून करण्यात येणार आहे. गट नेत्यासाठी उपगट नेते व्यंकट कारेमोरे, आतिश उमरे, कैलास बरबटे यांच्या नावांची चर्चा आहे. दरम्यान आज गट नेते निवडीबाबत महाल येथील भाजप कार्यालयात सर्व सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार टेकचंद सावरकर, अविनाश खडतकर, राजीव पोतदार उपस्थित होते.

नेत्यांनी सर्व सदस्यांची मत जाणून घेतली. एकएक करून सर्वांची मतं जाणून घेण्यात आली. काही सदस्यांनी दुसऱ्याची तर काहींनी स्वतःच उत्सुक असल्याचे सांगितले. पक्ष श्रेष्ठीचा निर्णय अंतिम असेही मत सदस्यांनी व्यक्त केले. बैठक जवळपास अडीच ते तीन तास चालली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कोर कमिटीची बैठक होणार आहे. आजची सर्व अहवाल गडकरी यांच्याकडे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गट नेत्याचे नाव अंतिम करण्यात येईल. उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

Sunil Kedar and Nitin Gadkari
पश्चिम महाराष्ट्रात मेट्रो प्रकल्प आणण्याचा विचार : नितीन गडकरी

जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे संख्याबळ आता वाढले आहे आणि सुनील केदार यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर घट्ट पकड मिळविली आहे. उपाध्यक्ष पद ते सहजासहजी हातचे जाऊ देणार नाही, अशी स्थिती आहे. पण आता भाजपचे हेवीवेट नेते खुद्द नितीन गडकरी या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याने उपाध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी होणार, असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.