BJP vc Vanchit : खोटे श्रेय घेण्याचे भाजपचे सोंग वंचितने ‘असे’ उघडे पाडले !

Akola : तात्पुरती व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली.
BJP and Vanchit Bahujan Aghadi
BJP and Vanchit Bahujan AghadiSarkarnama

Where are the representatives of the ruling BJP : वंचित बहुजन युवा आघाडीने भाजप जनप्रतिनिधीची पोलखोल करणारे आंदोलन केल्याने भाजपचे पितळ उघडे पडले आहे. गेली सहा महिने जनता त्रस्त असताना सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत, याची विचारणा जनता करीत होती. पण ते जनतेसमोर येत नव्हते, असा आरोप वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला.

राज्य आणि देशात भाजप सत्तेत आहे, पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्रस्त जनतेने गांधीग्राम येथे अनेकदा आंदोलने केली आहेत. त्यावर शासकीय निधीमधून दोन कोटी रुपयांचा तात्पुरती व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली असून, हा तकलादू पूल पहिल्याच पावसाळ्यात वाहून जाणार आहे. परिणामी पुन्हा अकोट मार्ग बंद पडणार असल्याने या तकलादू कामाचे खोटे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सोंग वंचित युवा आघाडीच्या टिमने उघडे पाडले.

वंचित बहुजन आघाडीने भाजपची बनवाबनवी उघड केली. त्यावर भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी अकांडतांडव सुरू केला असल्याचा आरोपही राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. आता या प्रकरणाचा झटका भाजपला आगामी निवडणुकीमध्ये बसेल, असेही पातोडे म्हणाले. कितीही प्रयत्न केले तरी भाजपला या प्रकरणातून बाहेर पडता येणार नाही. कारण वंचित बहुजन आघाडीने त्यांना उघडे पाडले आहे, असेही ते म्हणाले.

श्रेय घेण्याच्या स्वार्थासाठी पाणी घालवू नका : थोरात

बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ६९ खेडे हे खारपानपट्ट्याने शापीत असल्यामुळे या भागातील विहिरीला किंवा कूपनलिकेला गोड असे पिण्यायोग्य पाणी लागत नाही. म्हणून ‘हर घर नल हर घर जल’ या जलजीवन मिशनच्या योजनेत पाणी पुरवठा योजना मंजूर केली. ही योजना अकोट मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांमुळे स्थगित झाली असेल, तर बाळापूर मतदारसंघात एकट्या भाजपला कसे काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बदनाम केले जात आहे.

BJP and Vanchit Bahujan Aghadi
Akola : ‘सरकार समस्या क्या सुलझाए`, सरकारही एक समस्या है’, शेतकरी संघटना आक्रमक !

पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाची असताना योजनेचे श्रेय जसे ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) घेत असतील, तर ते ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अकोट मतदारसंघातील त्यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी बाळापूर मतदारसंघातील खारपानपट्टयात येणाऱ्या पाण्याला विरोध करत आहेत, त्यांना आधी समजावून सांगणे गरजेचे आहे.

विनाकारण राजकारण करून जनतेची दिशाभूल करू नये. तुम्ही बाळापुरात श्रेय घेण्यासाठी आंदोलनाचे नाटक करता आणि अकोट मतदारसंघात तुमच्या कार्यकर्त्यांना या योजनेच्या विरोधात पाठविता तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत फक्त खारपानपट्टयातील ६९ खेड्यांतील जनतेच्या तोंडचं पाणी पळवू नका, असे आवाहन भाजप (BJP) प्रदेश सदस्य तेजराव थोरात यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in