Amravatiमध्ये भाजप जोरात, महाविकास आघाडीतून कॉंग्रेस की शिवसेनेचा उमेदवार?

Congress : यापूर्वी कॉंग्रेस बी.टी. देशमुख यांना पाठिंबा देत आली आहे.
Amravati Graduate Constituency Election
Amravati Graduate Constituency ElectionSarkarnama

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) खूप आधीच ॲक्टीव झाला, तर कॉंग्रेसने (Congress) उशिरा तयारी सुरू केली. असे असले तरी आजस्थितीत भक्कम यंत्रणा उभी केली आहे. यापूर्वी कॉंग्रेस बी.टी. देशमुख यांना पाठिंबा देत आली आहे. आता आपला उमेदवार उभा करून स्वबळावर लढण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. संभाजी ब्रिगेडनेही आपला उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

अमरावती (Amravati) पदवीधर निवडणुकीत जास्त उमेदवार राहणार नाही, असे सध्यातरी दिसते. लढत भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमध्येच (Congress) होईल, असे आजचे चित्र आहे. कॉंग्रेसने समन्वय समिती गठित केली आहे. माजी महापौर मिलिंद चिमोटे यांची या समितीच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसने माजी सदस्य प्रा. बी. टी देशमुख यांना पाठिंबा दिला होता. यावेळी प्रथमच काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार निश्चित झाला नसला तरी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची तयारी कॉंग्रेसने केली आहे. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ३६० मतदार मतदानासाठी पात्र झाले आहेत.

भाजपचे विद्यमान विधान परिषद सदस्य रणजीत पाटील यांचीच उमेदवारी याही वेळी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाही. अकोला जिल्ह्यातील सुधीर ढोणे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या नावाचीही चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची उमेदवारासंदर्भात लवकरच बैठक होणार असल्याची माहिती आहे. आघाडीत ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली असली तरी शिवसेनेने येथे दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, याची उत्सुकता वाढली आहे.

अमरावती मतदारसंघावर शिवसेनेचा दावा..

अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघावर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटाने दावा केला आहे. त्यांपैकी नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी गंगाधर नाकाडे यांच्या नावाची घोषणाही शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केली.

अभ्यंकर म्हणाले, गेल्या ५ वर्षांपासून आमच्या उमेदवारांचे या क्षेत्रात मोठे काम आहे. गावोगावच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी त्यांनी संपर्क केलेला आहे. शिक्षकांचे प्रश्‍न, मग ते राज्य पातळीवरचे असो किंवा जिल्हा पातळीवरचे, ते सोडवण्याचे काम आमच्या लोकांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिक्षक सेनेसोबत दोन्ही मतदारसंघातील शिक्षक शक्तीनिशी उभे राहतील. महाविकास आघाडी मिळूनच हे उमेदवार ठरलेले आहेत आणि आम्ही एकत्र मिळूनच ही निवडणूक लढवणार आहोत, असे अभ्यंकर यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यात विधानपरिषदेची नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित केली आहे. शिक्षक सेनेचे उमेदवार म्हणून गंगाधरराव नाकाडे यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांशी यासंदर्भात नुकतीच चर्चा झाली, त्यांनीही या नावाला अनुकूलता दर्शविली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून आमच्या उमेदवारांना समर्थन मिळालेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हालाच यश मिळेल, याची खात्रीही अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

Amravati Graduate Constituency Election
Grampanchayat : अमरावती जिल्ह्यात देवेंद्र भुयार आणि बच्चू कडूंनी राखली आपली गावे…

आचारसंहिता लागू..

अमरावती पदवीधर मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू राहणार आहे..

३० जानेवारी २०२३ रोजी अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदान आणि २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. १२ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. १३ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. १६ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येईल. या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूक प्रचारार्थ कार्यासाठी किंवा निवडणुकीशी संबंधित दौऱ्यासाठी मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे उमेदवार, इत्यादी व्यक्तींना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com