Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी मागितली जाहीर माफी अन् कार्यकर्त्यालाही पक्षातून काढणार...

Chandrashekhar Bawankule Banner News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती आहे.
Chandrashekhar Bawankule News
Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama

Chandrashekhar Bawankule News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक नेते शुभेच्छा देणारे बॅनर लावतात. मात्र, नागपूर जिल्ह्यातील असाच एक जयंतीच्या शुभेच्छा देणारा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बॅनर वादग्रस्त ठरला.

कारण, या बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचा फोटो मोठा असल्याचे दिसत आहे. या बॅनरमुळे विरोधकांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली. त्यानंतर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे. बावनकुळे यांच्या बॅनरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत निशाणा साधला होता. आव्हाड म्हणाले होते, ''हा काय घाणेरडा प्रकार आहे. बावनकुळे साहेब, तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल आव्हाड यांनी विचारला होता.

Chandrashekhar Bawankule News
Ahmadnagar Politics : बावनकुळेंचे शिर्डीमध्ये वेगळे संकेत? खासदार विखेंना गाडीवर घेत केले सारथ्य

या बॅनरवरून बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''या बॅनरमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यांची माफी मागतो, असा फोटो लावणे मान्य नाही. ती कार्यकर्त्यांची चूक आहे. ते बॅनर तातडीने काढण्यात आले. संबंधित कार्यकर्त्यांनी माफीनामाही लिहून दिला आहे. मात्र, हा प्रकार माफी योग्य नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. त्या कार्यकर्त्याला पक्षातून काढणार असून कारवाई करणार, असल्याचा त्यांनी स्पष्ट केले आहे.

बावनकुळेंच्या कार्यालयाने दिले स्पष्टीकरण

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले होते. या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आले आहे. बॅनरवर नावे लिहून प्रसिद्धीचा प्रयत्न करणाऱ्या पाच व्यक्तींनी माफी मागितली आहे. ही चूक आमच्याकडून झालेली आहे, याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाशी भाजप व प्रदेशाध्यक्षांचा कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Chandrashekhar Bawankule News
Sharad Pawar News : दुर्दैवाने आयातीला प्रोत्साहन देणारे सरकार; शरद पवारांचा हल्लाबोल

चूक लक्षात आली तशी त्या कार्यकर्त्यांनी लेखी माफी मागितली. तसे माफीचे बोर्डही लावले आहेत. भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहे. आपण विकासाचे काम करू या, असे आवाहन बावनकुळे यांच्या कार्यलयाकडून करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com