परमबीर सिंहचा पत्ता भाजपनेच शोधावा, अन् त्याला भारतात आणावे...

लोकांच्याही लक्षात भाजपचे सुडाचे राजकारण आले आहे. त्यामुळे लोक त्यांचे उमेदवार आता निवडून देत नाहीत, असे पटोले State President of Congress Nana Patole यांनी सांगितले.
परमबीर सिंहचा पत्ता भाजपनेच शोधावा, अन् त्याला भारतात आणावे...

नागपूर ः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक करणे, ही द्वेषपूर्ण कारवाई आहे. ज्यांनी देशमुखांवर गंभीर आरोप केले, ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अजूनही बेपत्ता आहेत. आरोप करणाराच जर बेपत्ता असेल, तर केंद्रामध्ये बसलेले भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मूळ मुद्द्य़ांना बगल देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केला.

पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांकडून देशवासीयांचे लक्ष भटकवण्यासाठी, हे प्रकार केले जात आहे. अशा द्वेषपूर्ण कारवाया केल्या जात आहेत. परमबीर सिंहचा पत्ता भाजपने काढावा आणि त्याला देशासमोर आणावे, म्हणजे खरं काय ते लोकांसमोर येईल. पण केंद्रात बसलेली भाजप हे करणार नाही. कारण त्याला फरार करण्यामागे भाजपचीच मंडळी आहे. परमबीर सिंह बेल्जिअममध्ये असल्याचे कॉंग्रेस नेत्यानेच सांगितले आहे, असे विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारजवळ येवढ्या मोठ्या यंत्रणा आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी परमबीर सिंहचा शोध घेऊन त्याला आणले पाहिजे. आम्ही तर आधीच सांगितले होते, की परमबीर सिंहचे भारतातील शेवटचे लोकेशन हे अहमदाबाद होते. ईडीनेही हीच माहिती दिली होती.

अहमदाबादमधून जर परमबीर सिंह फरार झाला असेल, तर त्यामागे कुणाचा हात आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गुजरातमधूनच त्याने पलायन केले आहे आणि केंद्रीय यंत्रणांनीच त्याला मदत केली असल्याचे पटोले म्हणाले. अनिल देशमुखांवर अटकेची कारवाई केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कारवाईचा फास आवळला जातोय. महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी भाजपचे हे कारस्थान आहे का, असे विचारले असता, भाजपच्या अशा कारवायांमुळे महाविकास आघाडी अजिबात अस्थिर होणार नाही, तर मजबूतच होणार आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते लोक करत आहेत. पण त्याचा काही एक फरक पडणार नाही. याचे कारण म्हणजे देगलुरमध्ये आज महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकतो आहे. लोकांच्याही लक्षात भाजपचे सुडाचे राजकारण आले आहे. त्यामुळे लोक त्यांचे उमेदवार आता निवडून देत नाहीत, असे पटोले यांनी सांगितले.

परमबीर सिंहचा पत्ता भाजपनेच शोधावा, अन् त्याला भारतात आणावे...
ही तर भाजपची द्वेषाने पछाडलेली मानसिकता : अतुल लोंढे

अनिल देशमुखांवरील कारवाई ही केवळ आणि केवळ सूडभावनेतून करण्यात आली आहे. जनतेच्या लक्षात हे येत आहे. त्यामुळे भाजपबद्दल लोकांच्या मनात राग वाढत चाललेला आहे. फेल झालेल्या सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी सूडबुद्धीने कारवाया करण्याचे सत्रच त्यांनी अवलंबिले आहे. विविध आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो प्रकार चाललेला आहे, तो फार काळ चालणार नाही. सरकार पाच वर्ष चालणारच आहे, त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, असे पटोले यांनी सांगितले. अदानीच्या गुजरातमधील पोर्टवरून ड्रग्ज भारतात आणलं जात आहे आणि देशातील तरुणांनी नशेच्या आहारी टाकण्याचे षड्यंत्र भाजपकडून रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com