भाजपला बालेकिल्ल्यात धक्का : अजितदादांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वाशिममधील भाजप पदाधिकाऱ्यांनी, तर नवी मुंबईतील आपच्या कार्यकर्त्यांनी हात बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ
BJP office bearers join NCP
BJP office bearers join NCPSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाचे (bjp) माजी नगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह पक्षातील अनेक मान्यवरांनी आज (ता. २ जून) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपला विदर्भाच्या बालेकिल्यात हा धक्का मानला जात आहे. तसेच, नवी मुंबईतील आम आदमी पक्षाचे (AAP) दत्तात्रेय नागरे यांनीही हाती घड्याळ बांधले. (BJP office bearers from Washim join NCP)

मुंबईतीन राष्ट्रवादी भवनात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पक्षाच्या नेत्यांनी या सर्वाचे स्वागत केले. वाशिममधील भाजपचे माजी नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर, किरण क्षीरसागर, तालुकाध्यक्ष गजानन दहातोडे, कपिल नकवाल, अनिल अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते अंकुश देशमुख, बाबाराव खडसे, सोनाली ठाकूर, युसुफ पुंजाणी, दत्ता डहाके, अशोक परळीकर उपस्थित होते.

BJP office bearers join NCP
रमेश कदम, भुजबळांचा दाखल देत मलिक, देशमुखांच्या मतदानासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील

याच कार्यक्रमादरम्यान नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या पुढाकाराने आम आदमी पक्षातील, नवी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय नागरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. त्यांच्यासमवेत सचिन सावंत, चंद्रकांत पाटील यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी लाभदायी ठरण्याची चर्चा आहे.

BJP office bearers join NCP
राज्यसभा निवडणुकीबाबत अजितदादांचं सूचक विधान : 'अर्ज सहा की सात, यावर चर्चा सुरू आहे!'

या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com