BJP Amravati Lok Sabha: जयंत डेहणकर अमरावती लोकसभेसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख !

BJP Election Chief for Amravati Lok Sabha : चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक प्रमुखांची घोषणासुद्धा केली.
Jayant Dehankar
Jayant DehankarAmravati

Vidarbha BJP Lok Sabha Elections Chief News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने त्यामध्ये बाजी मारली असून पक्षाच्यावतीने लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची यादी काल (ता. आठ) जाहीर करण्यात आली. (The list of election chiefs was announced yesterday)

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून प्रदेश सरचिटणीस जयंत डेहणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेसोबतच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक प्रमुखांची घोषणासुद्धा केली. अमरावती विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून आमदार प्रवीण पोटे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय धामणगावरेल्वे मतदारसंघ जगदीश रोठे, बडनेऱ्याचे प्रमुख म्हणून शहराध्यक्ष किरण पातूरकर, तिवसाचे प्रमुख राजेश वानखडे, दर्यापूरकरिता गोपाल चंदन, मेळघाटकरिता प्रभुदास भिलावेकर, अचलपूरकरिता प्रवीण तायडे तर मोर्शी मतदारसंघाची जबाबदारी डॉ. मोहन आंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त जयंत डेहणकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. डेहणकर यांनी यापूर्वी भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा सांभाळली आहे.

माजी मंत्री प्रवीण पोटेंना अमरावतीची जबाबदारी..

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाने जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, अमरावती महापालिका निवडणुकीची धुरासुद्धा यापूर्वी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. यासोबतच मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना त्यांच्याच मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Jayant Dehankar
BJP News : भाजपचे शहराध्यक्ष दटकेंवर नागपूर, तर जिल्हाध्यक्ष गजभीयेंवर रामटेकची जबाबदारी !

वर्षभरावर लोकसभा निवडणूक (Election) आली आहे. तर, त्यानंतर विधानसभेचीही निवडणूक काही दिवसांनी येत आहे. या दोन्ही निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपने (BJP) एक पाऊल टाकले आहे. निवडणूकीच्या विषयात भाजप नेहमीच पुढे असतो. आम्ही निवडणूक आल्यावर तयारी करत नाही, तर नेहमी तयारच असतो, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नेहमीच सांगत असतात. कृतीतूनही भाजपने हे दाखवून दिले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com