Nagpur Assembly Constituency News: नागपूर पूर्वमध्ये भाजपला पराभूत करणे आघाडीसाठी अवघड नाही, पण...

Mahavikas Aghadi : कोणत्या पक्षाचा उमेदवार येथून भाजपला टक्कर देईल?
BJP and Mahavikas Aghadi
BJP and Mahavikas AghadiSarkarnama

East Nagpur Assembly Constituency News : नागपुरात रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेष करून जेथे ही सभा झाली, त्या पूर्व नागपुरातील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली. महाविकास आघाडीला येथे भाजपला पराभूत करणे अजिबात अवघड नाही. पण कोणत्या पक्षाचा उमेदवार येथून भाजपला टक्कर देईल, यावर पुढील गणिते अवलंबून असणार आहेत. (Political equations changed after the Vajramooth meeting)

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दावा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी पूर्व नागपूर मतदारसंघ मिळावा, याकरिता राष्ट्रवादीतर्फे चांगलाच जोर लावण्यात आला होता.

शेवटपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. काँग्रेसचे काही नेते त्यासाठी राजीसुद्धा झाले होते. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांना गाफील ठेवून शेवटच्या क्षणी आपली खेळी केली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली.

हा मतदारसंघ मिळवता आला नाही याची सल अनेकदा राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विविध बैठका आणि सभांमधून बोलून दाखविली आहे. यात आपलीच चूक झाली, असेही ते म्हणाले होते. यापुढे असे घडणार नाही, असेही आश्वासन त्यांनी राष्ट्रवादीच्या संपर्क यात्रेदरम्यान झालेल्या बैठकांमधून दिले आहे. त्यामुळे अनेकजण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत.

BJP and Mahavikas Aghadi
MVA Nagpur Sabha : भाजपच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी आवळली 'वज्रमूठ'

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे या भागाचे नगरसेवक आहेत. त्यांना अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ खुणावत आहे. शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सारी ताकद व राष्ट्रवादीची यंत्रणा पूर्वमध्ये लावली आहे. पूर्व आणि मध्य नागपूरच्या टोकावर राहणाऱ्या नगरसेविका आभा पांडे यांनाही पूर्वमध्येच स्वारस्य आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमसुद्धा येथेच झाला होता.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आभा पांडे यांची पक्ष प्रवेशानंतर लगेच महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली. महाविकास आघाडीची स्थापना आणि रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सतीश चतुर्वेदी यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आजही येथे आहेत.

BJP and Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi News : वज्रमूठ सभा राजकारणाला नवी दिशा देणार, आघाडीच्या नेत्यांना विश्‍वास..

पुरुषोत्तम हजारे नवखे असताना त्यांना मिळालेली लक्षणीय मते याची ग्वाही देतात. काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) लढल्यास भाजपला येथे पराभूत करणे अवघड नाही, असा विश्वास महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेने दिला आहे. आघाडीच्या जागावाटपाची बोलणी यशस्वी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही (Election) उपेक्षित राहावे लागू शकते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com