BJP News : सुमीत वानखडे बघणार वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंत्रणा !

Wardha : विधानसभेकरिताही जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
Sumit Wankhade
Sumit WankhadeSarkarnama

Vidarbha BJP Lok Sabha Elections Chief News : भारतीय जनता पक्षाची लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. त्यांच्याकडून लोकसभानिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या नियुक्तीत वर्धा लोकसभेची जबाबदारी सुमित वानखडे यांच्यावर सोपवली आहे. (Gaining recognition for the impact of his work in the sub-division Arvi)

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपकडून आखणी करणे सुरू झाले आहे. केवळ लोकसभेकरिताच नाही तर विधानसभेकरिताही जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सुमित वानखडे सध्या आर्वी उपविभागात आपल्या कामाच्या प्रभावाने ओळख वाढवत आहेत.

आता वानखडेंवर लोकसभेची जबाबदारी देण्यात आल्याने ते त्याच प्रकारे लोकसभा क्षेत्रातही काम करतील, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. रामदास तडस वर्धेचे खासदार आहेत. हा मतदारसंघ त्यांच्याकडेच कायम ठेवण्याची जबाबदारी सुमोत वानखडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात भाजपचे प्राबल्य आहे. शिवाय उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून काम करण्याचा असलेला अनुभव, यामुळे ते ही जबाबदारी सहज पार पाडतील, असे पक्षात बोलण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वात येत्या निवडणुकीत पक्षाला हमखास यश मिळेल, असे भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.

Sumit Wankhade
MLA Keche-Wankhade War : चार-पाच महिन्यांपासून सुरू होता वाद, अति झाल्यामुळे आला चव्हाट्यावर !

सुमित वानखडे यांच्या नियुक्तीसोबतच वर्धा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रशांत बुर्ले, देवळीची राजेश बकाने, हिंगणघाट संजय डेहणे, तर आर्वी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी बाळा नांदूरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख लोकसभा मतदारसंघ प्रमुख सुमित वानखडे यांच्या नेतृत्वात काम करणार आहेत.

पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक (Election) प्रमुख म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. वर्धेची (Wardha) जबाबदारी माझ्यावर आहे. प्राप्त परिस्थितीत आणि वेळेत पक्ष संघटनेवर जोर राहील. सोबतच केंद्रीय कार्यालयातून आलेल्या कार्यक्रमात निवडणूक नियोजनासह लोकसभा आणि विधानसभा उमेदवाराचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करणार, असे सुमित वानखडे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com