Bhandara - Gondia BJP: भंडारा-गोंदियाची जबाबदारी माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्या मुलाकडे !

Vijay Shivankar : विजय शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Vijay Shivankar, Bhandara-Gondia
Vijay Shivankar, Bhandara-GondiaSarkarnama

Vidarbha BJP Lok Sabha Elections Chief News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील मतदारसंघांच्या प्रमुखांची निवड केली आहे. भाजपने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात येत्या २०२४च्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक प्रमुखांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (ता. आठ) केली. (State president Chandrasekhar Bawankule announced the names of the chiefs)

भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी गोंदियाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय शिवणकर हे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे चिरंजीव आहेत. 1990 च्या दशकात महाराष्ट्रात मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये महादेवराव शिवणकर सिंचन मंत्री होते.

लोकसभा मतदारसंघासोबतच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात साकोली विधानसभा मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री परिणय फुके, भंडाऱ्यासाठी अनुप ढोके, तुमसरसाठी माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार हेमंत पटले, तिरोडा-गोरेगाव विधानसभा निवडणूक प्रमुखपदी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. वसंत भगत, अर्जुनी मोरगाव विधानसभा निवडणूक प्रमुख पदावर माजी मंत्री राजकुमार बडोले, आमगाव विधानसभा माजी आमदार संजय पुराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vijay Shivankar, Bhandara-Gondia
BJP News : जयंत डेहणकर अमरावती लोकसभेसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख !

वर्षभरावर लोकसभा निवडणूक (Election) आली आहे. तर, त्यानंतर विधानसभेचीही निवडणूक काही दिवसांनी येत आहे. या दोन्ही निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपने (BJP) एक पाऊल टाकले आहे. निवडणुकीच्या तयारीत भाजप नेहमीच पुढे असतो. आम्ही निवडणूक आल्यावर तयारी करत नाही, तर नेहमी तयारच असतो, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नेहमीच सांगत असतात. कृतीतूनही भाजपने हे दाखवून दिले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com