J P Nadda : भाजपच्या 'मिशन १४४' ची सुरुवात महाराष्ट्रातून होणार; जे.पी.नड्डा 'या' मतदारसंघात घेणार सभा

J P Nadda News : नड्डा नेमकी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
J. P. Nadda
J. P. NaddaSarkarnama

J P Nadda News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे उद्या (२ जानेवारी २०२३) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नड्डा हे चंद्रपूरमधून 'मिशन १४४' च्या तयारीला सुरवात करणार आहेत.

दोन जानेवारीला नड्डा हे चंद्रपूर येथे येणार आहेत. ते चार्टर्ड विमानाने सकाळी ११ वाजता चंद्रपूरच्या विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते चंद्रपूरमधील देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर चंद्रपूरमध्ये नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी नड्डा हे 'मिशन १४४' ची सुरवात करणार आहेत.

या सभेनंतर ते एका बैठकीत संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते औरंगाबाद (Aurangabad) येथे होणाऱ्या सभेसाठी रवाना होणार आहेत. यावेळी त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. तर नड्डा यांच्या या दौऱ्यासाठी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये खास तयारी देखील करण्यात आली आहे.

J. P. Nadda
Sharad Pawar : पत्रकारांना ती गोष्ट सांगू नका : शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा हे सध्या तयारी करताना दिसून येत आहे.

भाजपचे 'मिशन १४४' काय आहे?

येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कारण २०२४ ची निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने 'मिशन १४४' सुरु केलं आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला विजय मिळालेला नव्हता अशा देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत करण्यास सुरू केलं आहे.

J. P. Nadda
Abdul Sattar : माझ्याविरोधात कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली : सत्तारांचे मोठे विधान

यामध्ये 'मिशन १४४' साठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. तर आता भाजपचे प्रमुख नेते या १४४ मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे औरंगाबाद आणि चंद्रपूर येथे उद्या जे.पी.नड्डा यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे आता नड्डा नेमकी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com