भाजप आमदार म्हणाले; बच्चू भाऊंनी डेअरींग केले, मी त्यांच्यासोबत...

ज्या रस्त्यावरून वंचितने पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची तक्रार केली आहे, त्या रस्त्याचे काम भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी सुचविलेले आहे.
भाजप आमदार म्हणाले; बच्चू भाऊंनी डेअरींग केले, मी त्यांच्यासोबत...
Bacchu Kadu and Randheer SawarkarSarkarnama

अकोला : अकोल्याचे (Akola) पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील विकासासाठी तसेच जनतेच्या समस्या निराकरणासाठी मी त्यांच्या सोबत राहील, अशी भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी घेतली आहे. तर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषदेतच भ्रष्टाचार होत आहे, तो भ्रष्टाचार पालकमंत्री कडू यांनी काढावा, असे म्हणत पालकमंत्री कडू यांची त्यांनी पाठराखण केली आहे.

ज्या रस्त्यावरून वंचितने पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची तक्रार केली आहे, त्या रस्त्याचे काम भाजपचे आमदार रणधीर सावरकर (MlA Randheer Sawarkar) यांनी सुचविलेले आहे, तर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या बाळापूर मतदारसंघातील कामसुद्धा डिपीसीतून होणार आहे. त्यामुळेच हे दोन्ही आमदार पालकमंत्री बच्चू कडुंच्या पाठीशी उभे झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याशिवाय त्यांच्या या भूमिकेमागे जिल्हा परिषदेचे राजकारणही कारणीभूत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

पालकमंत्री कडू आणि वंचित यांच्यात विकासाच्या नावावर सुरू असलेल्या राजकीय कुरघोडीत भाजप आमदार हे कडू यांच्या बाजूने उभे राहिले आहे. दरम्यान, पालकमंत्री कडू यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि त्यांना त्यामधून जामीन मिळाल्यानंतर भाजपचे आमदार सावरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री कडू यांच्याविरोधात वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात जाऊन न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पालकमंत्री कडू यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीनही मिळविला. मात्र, पालकमंत्री बच्चू कडू आणि वंचितच्या राजकीय वादात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी उडी घेऊन पालकमंत्री कडू यांचा बचाव केला आहे.

यामध्ये भाजपचे आमदार सावरकर म्हणाले, पालकमंत्री बच्चू कडू हे महाविकास आघाडीचे मंत्री आहेत. त्यांच्याविषयी माझा राजकीय विरोध पहिलेपासून होता. राहिला विषय या रस्त्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा. माझे स्वतःचे पत्र होते की कुटासा ते पिंपळोद या रस्त्यावरचा फुल करणे अत्यंत आवश्यक आहे. वीस वर्षांपूर्वी हा बांधलेला पूल कोसळला होता. अकोला ते अमरावतीला जोडणारा हा मार्ग या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर जवळपास दोन हजार एकर जमीन आहे. या रस्त्यावर पूल घेतला तर या रस्त्यावर भ्रष्टाचार कसा काय झाला, असा प्रश्न भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला आहे.

Bacchu Kadu and Randheer Sawarkar
एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला असेल तर हात कलम करेल : बच्चू कडू

जे टेक्निकल म्हणणे होते, त्याला नंबर ते देण्यात आले नव्हते. भ्रष्टाचाराचा अर्थ काय असतो? तुम्ही बिल काढले आणि कामच नाही केले तर याला भ्रष्टाचार म्हणतात. परंतु, एखाद्या रस्त्याला व्ही. आर. नंबर नाही आणि त्याच्यावर काम घेतले, तर तो शासनाचा विशेष बाब म्हणून अधिकार आहे, असेही आमदार सावरकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. पालकमंत्री कडू यांनी जी कामे डीपीसीच्या माध्यमातून प्रस्तावित केली, मंजूर केली ते टेक्निकली अवैध असणारी कामे आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी वर्ग हा दळणवळणापासून वंचित होता. शेतकऱ्यांनी या रस्त्याअभावी पिके घेणे बंद केली होती. आज हे रस्ते होणे आवश्यक आहे. त्यामुळे मी माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. या रस्त्याच्या विषयामध्ये मला वाटत नाही की कुठलाही भ्रष्टाचार झाला आहे. मी तर हे म्हणेल की बच्चू भाऊंनी डेअरिंग करून थोडेसे कायद्याच्या बाजू गेले असतीलही तर तरीही जनतेच्या समस्या निराकरण करण्यासाठी मी त्यांच्यासोबत राहील, असे आश्वासनही भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रा. धैर्यवधन पुंडकर यांनी पालकमंत्री कडू यांच्या विरोधात केलेली तक्रार मुळातच चुकीची आहे. पालकमंत्र्यांनी स्वतः कामे टाकली नाही. तर जिल्ह्यातील आमदारांनी ती कामे दिलेली आहेत. ती कामे चांगल्या प्रकारे सुरू आहेत. मुळात डीपीडीसीचा निधी जिल्हा परिषदेकडूनच खर्च केला जात नाही. अनेक वर्षांपासून हा निधी तिथे पडून आहे. खरे पाहिले तर खरा भ्रष्टाचार हा जिल्हा परिषदेमध्येच आहे. हा भ्रष्टाचार पालकमंत्री कडू यांनी उखडून काढावा. गेल्या पंधरा वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषदमध्ये सत्ता आहे. या सत्तेमध्ये जिल्ह्याचा विकासही खुंटला आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी करीत पालकमंत्री बच्चू कडू यांची पाठराखण केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.