BJP MLA Abuse : भाजपा आमदाराची निवृत्त आयुक्ताला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, महिला असल्याचेही नाही भान !

Amravati MLA Pravin Poto : आमदार पोटे शिवीगाळ करीत असताना महिला तेथे उपस्थित होत्या.
Pravin Pote
Pravin PoteSarkarnama

Amravati City Political News : अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. आमदार पोटे यांनी महापालिकेचे निवृत्त झालेल्या आयुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. शिवीगाळ करीत असताना काही महिला कर्मचारीसुद्धा या बैठकीला उपस्थित होत्या. (Women were present there when the MLA was abusing)

आमदार पोटे शिवीगाळ करीत असताना महिला तेथे उपस्थित होत्या, हे व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. असे कृत्य करताना आपल्या आजूबाजूला कोण आहेत, याचे भान लोकप्रतिनिधींनीच नव्हे तर प्रत्येकाने ठेवणे आवश्‍यक आहे. पण आमदार पोटेंना संतापाच्या भरात याचा विसर पडला आणि ते तेथेच ‘सुरू’ होऊन गेले. महिला कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांसमोर आमदार महोदयांची जीभ घसरली. याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

अमरावती शहरात स्वच्छता होत नसल्याने महापालिकेत स्वच्छता या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अधिकारी कर्मचारी यांच्यासह भाजपाचे काही माजी नगरसेवक उपस्थित होते. अमरावती शहरात स्वच्छता होत नसल्याचे म्हणत आमदार पोटे यांनी कंत्राटदारांसह महापालिकेचे निवृत्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना शिवीगाळ केली.

या बैठकीला पोटे यांच्या बाजूला आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार हेसूद्धा बसले होते. आमदार महोदयांनी सात सेकंदांत पाच वेळा खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे. त्यामुळे पोटे यांनी केलेल्या शिवीगाळीची चर्चा अमरावती शहरात दिवसभर सुरू होती. पोटे यांच्या या विधानावरून काही कंत्राटदारांनी निषेध नोंदवला असल्याची माहिती आहे.

महिला असल्याचेही भान नाही...

अमरावती शहरात स्वच्छता होत नसल्याने आमदार पोटे यांनी आयुक्त देविदास पवार यांच्यासह भाजपच्या काही माजी नगरसेवकासह बैठक बोलावली होती. या बैठकीला महिला कर्मचाऱ्यांसह काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तीन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर पोटे यांनी आरोप करीत त्यांना आणि कंत्राटदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या बैठकीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

आपल्या शहराच्या स्वच्छतेबाबत आमदार पोटे जागरूक आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्याबाबत बोलताना त्यांची तळमळसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. कंत्राटदार आणि त्यांची माणसे कामचुकारपणा करतही असतील. त्यामुळे आमदार पोटेंनी जे केले, ते योग्यच आहे. पण फक्त अर्वाच्य शिवीगाळ टाळली असती, तर त्यांना आज कंत्राटदार आणि सामान्य लोकांच्या टीकेचे धनी व्हावे लागले नसते.

Edited By : Atul Mehere

Pravin Pote
Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेवर कसला ‘पंजा’, मालमत्ता करवाढ भोवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com