BJP Mission 144 : जे.पी नड्डा आज चंद्रपूर दौऱ्यावर येणार: काय आहे कारण?

नवीन वर्षाला सुरुवात होताच भारतीय जनता पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.
BJP Mission 144 | J. P. Nadda
BJP Mission 144 | J. P. Nadda

BJP Mission 144 : नवीन वर्षाला सुरुवात होताच भारतीय जनता पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. तर २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकार आणि संघटनांचेही स्वरुप बदलण्यात येणार आहे. येत्या काही दिवसातच निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात महाराष्ट्रात आजपासूनच होणार आहे.

विशेष म्हणजे असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज (२ जानेवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून या मिशनला सुरुवात होत आहे.‘लोकसभा प्रवास योजने’अंतर्गत नड्डा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार असून जाहीर सभा घेणार आहेत.

BJP Mission 144 | J. P. Nadda
Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर ठाकरेंपाठोपाठ शिंदे गटही? 'या' नेत्याबाबत मोठं विधान

पुढील वर्षी २०२४ एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. पण त्यासाठी भाजपने आजपासून देशभरात तयारी सुरू केली आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी नड्डा स्वत: प्रत्येक राज्यात ‘प्रवास’करणार आहेत. देशभरातील एकूण ५४५ लोकसभा मतदारसंघांपैकी, भाजपने १६० मतदारसंघ महत्त्वाचे मतदारसंघ निवडले आहेत. यात महाराष्ट्रातले एकूण १४४ मतदारसंघ आहेत. यातील १८ मतदारसंघ भाजपसाठी अवघड असल्याने त्यावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. आजच्या दौऱ्यात नड्डा यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रावसाहेब दानवे यांसारखे दिग्गज नेते नड्डा यांच्या एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून 48 जागा लढवल्या, त्यात भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. पण 2019 मध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील AIMIM ने शिवसेनेकडून औरंगाबादची जागा हिसकावून घेतली.

भाजपचे लोकसभा बैठकीचे समन्वयक संजय उर्फ ​​बाळा भेगडे यांनी सांगितले की, नड्डा सोमवारी चंद्रपूरमध्ये त्यांच्या पहिल्या सभेला संबोधित करतील, त्यानंतर संघटनात्मक बैठक होईल. त्यांचा दुसरा मेळावा औरंगाबाद येथे होणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com