भाजप सदस्यांचा सहलीत थाट, अन् कॉंग्रेसचे सदस्य बघताहेत वाट...

जसे भाजपचे (BJP) नगरसेवक फुटू शकतात. तसेच काँग्रेसचेही (Congress) नगरसेवक फुटू शकतात. मात्र, याची पक्षाला चिंता नसल्याचं एकंदरीत हालचालींवरून दिसत आहे.
BJP's members on tour
BJP's members on tourSarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 10 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीत मतदार फुटू नये, यासाठी भाजपनं (BJP) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेतील नगरसेवकांना सहलीवर पाठवलं आहे. मात्र, काँग्रेसचे (Congress) नगरसेवक घरीच आहेत. त्यांना उमेदवार किंवा पक्षानं कुठंही पाठवलं नाही. त्यामुळं ‘भाजप सदस्यांचा सहलीत थाट, अन् कॉंग्रेसचे सदस्य बघताहेत वाट...’ अशी परिस्थिती आहे.

नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी भाजपने आपले 334 नगरसेवक सहलीवर पाठवले आहेत. गोवा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, गुजरात अशा ठिकाणी भाजप नगरसेवक एन्जॉय करत आहेत. मात्र, तिकडे काँग्रेसच्या नगरसेवकांना ना उमेदवार विचारत आहे ना पक्ष. कुणी त्यांच्याकडे ढुंकुनही बघायला तयार नाही. जसे भाजपचे नगरसेवक फुटू शकतात. तसेच काँग्रेसचेही नगरसेवक फुटू शकतात. मात्र, याची पक्षाला चिंता नसल्याचं एकंदरीत हालचालींवरून दिसत आहे.

विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याच्या इतिहास आहे. याही निवडणुकीत तो होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं मतदार असलेले नगरसेवक या संधीची वाट बघत असतात. मतदानासाठी मोठी रक्कम या मतदारांना स्वतः च्या आणि विरोधी पक्षाकडूनही मिळत असते. त्यामुळं हे मतदान फुटू नये, यासाठीच पक्ष या नगरसेवकांना इतरत्र सहलीवर पाठवत असते. भाजपनं पाठवलंय. मात्र, काँग्रेसनं न पाठविल्यानं काँग्रेस नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे.

BJP's members on tour
राज ठाकरे भाजप-मनसे युतीचा निर्णय सोमवारी नाशिकमध्ये घेणार?

४५० पेक्षा जास्त मते घेऊ..

आम्ही आपले सर्व सदस्य सहलीवर पाठवले आहेत. त्यामुळे विजयाबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. आमचे सदस्य संघटित असून ते फुटणार नाहीत, उलट काँग्रेसचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. राज्याचा कारभार करताना महाविकास आघाडीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. विधानपरिषद निवडणुकीबाबतही तीच स्थिती आहे. शिवसेनेचा कॉंग्रेसवर विश्‍वास नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांना अद्याप सूचना, आदेश काहीच मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे नगरसेवक आमच्याशी संपर्क साधत आहेत. आम्ही ४५० पेक्षा जास्त मते घेऊन विजयी होऊ.

- अविनाश ठाकरे, भाजप सत्तापक्ष नेते, नागपूर महानगरपालिका.

भाजपचा त्यांच्या लोकांवर विश्‍वास नाही..

भारतीय जनता पक्षाचा त्यांच्याच पक्षाच्या लोकांवर विश्‍वास नाही. त्यामुळे त्यांना इतर राज्यांमध्ये हलविले गेले आहे आणि पाळत ठेवण्यात येत आहे. असे लोक विजयाची खात्री देतात, तेव्हा हसायला येतं. आमचे सर्व सदस्य आमच्यासोबत मनापासून आहेत. त्यामुळे त्यांना कुठे पाठवण्याची किंवा पाळत ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. भाजपचे सदस्य आमच्या संपर्कात आहेत. पण हे निकालाच्या दिवशी म्हणजे १४ डिसेंबरलाच दिसणार आहे.

- संजय दुबे, प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in