Nagpur BJP : नितीन गडकरी खासदार क्रिडा महोत्सवात राडा; भाजप नेत्याच्या मुलाची पंच, आयोजकांना मारहाण

यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत.
Nagpur BJP : नितीन गडकरी खासदार क्रिडा महोत्सवात राडा; भाजप नेत्याच्या मुलाची पंच, आयोजकांना मारहाण

Nagpur Politics : नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने महोत्सवाच्या पंच आणि आयोजकांनाच मारहाण केली आहे. यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे कट्टर समर्थक आहेत. यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात सध्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याने या महोत्सवाला गालबोट लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती चौकात खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत खामला इलेव्हन आणि स्टार इलेव्हन या दोन संघामध्ये सामना होता.

Nagpur BJP : नितीन गडकरी खासदार क्रिडा महोत्सवात राडा; भाजप नेत्याच्या मुलाची पंच, आयोजकांना मारहाण
Solapur Politics : राजकारण तापलं! तांबेवरील कारवाईनंतर पदाधिकाऱ्याचा राजीनामा

यातील एका संघात मुन्ना यादव यांचा मुलहा अर्जुन आणि करन हे दोघेही खेळत होते. सामना सुरू असताना अर्जुनने थ्रो बॉल च्या मुद्द्यावरुन पंचांशी वाद घालायला सुरुवात केली. पंचांनी त्याला समजावून सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता. अर्जुनने रागाच्या भरात ग्राउंडवरच गोंधळ घालायला सुरुवात केली.

तरीही पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्याने त्याने भर मैदानात प्रेक्षकांसमोरच पंचांना आणि आयोजकांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर यादव समर्थकांनीही वाद शमवण्यापेक्षा अर्जुनला साथ देत मैदानात गोंधळ घातला. सामना सुरु असतानाच असा गोंधळ झाल्यामुळे आयोजकांनी सामना बंद केला. घडलेल्या सर्व प्रकाराची महोत्सवाचे आयोजक संदीप जोशी यांच्याकडे करण्यात आली. मात्र दोन दिवस उलटूनही आयोजकांनीही यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणातील पीडित पंचांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in