भाजप नेते धास्तावले; म्हणतात, नवी प्रभाग रचना कॉंग्रेसच्या फायद्याची...

पश्चिम आणि दक्षिण नागपूर (Nagpur) विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा फटका भाजपला (BJP) बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nagpur City
Nagpur CitySarkarnama

नागपूर : शहरातील नव्या प्रभाग रचनेमुळे भाजपचे नेते चांगलेच धास्तावले आहेत. ज्या पद्धतीने प्रभागांची काटछाट केली. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर, पश्चिम आणि दक्षिण नागपूर (Nagpur) विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन प्रभाग रचना कॉंग्रेसच्या (Congress) फायद्याची असल्याचे भाजपच्या (BJP) एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या फायद्यासाठी प्रभाग रचनेत हस्तक्षेप केल्याचा आरोप आता भाजप आणि बसपाकडून केला जात आहे. याचा थेट फटका स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक विक्की कुकरेजा यांना बसणार असल्याचे बोलले जाते. सिंधी समाजाचे एकगठ्ठा मते असलेल्या जरीपटका प्रभागाचे नव्या रचनेत तीन तुकडे झाले आहेत. दुसरीकडे बसपाची व्होट बँक असलेल्या प्रभागांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. त्यामुळे बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनाही मतदारसंघ बदलावा लागणार आहे. सध्या उत्तर नागपूरमध्ये भाजपचे १२, बसपाचे १० आणि काँग्रेसचे सहा नगरसेवक आहेत. बसप व भाजपला फटका बसल्यास याचा थेट फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यामुळे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसला यावेळी मोठा ॲडव्हांटेज मिळणार असल्याचे दिसून येते. ज्या पद्धतीने प्रभाग रचना झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातही काँग्रेस नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. प्रभाग क्रमांक १६ राजनगर परिसर, प्रभाग क्रमांक १७ गिट्टीखदान पोलिस लाइन टाकळी, प्रभाग क्रमांक १८ गोरेवाडा परिसर, प्रभाग क्रमांक १९ वायुसेनानगर-दाभा परिसर, प्रभाग क्रमांक २१ रविनगर-गड्डीगोदाम या प्रभागांना जोडण्यात आलेल्या नव्या वस्त्यांमुळे या मतदारसंघात काँग्रेसला मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Nagpur City
नागपूर, पुण्यात जो धक्का बसला तो टाळण्यासाठी भाजपची आतापासूनच पावले..

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानेसुद्धा प्रभाग रचना काँग्रेसच्या फायद्याची असल्याचे सांगितले. मध्य नागपूर भाजपला फायदेशीर ठरणार असल्याचे दिसत असले तरी मुस्लिम बहुल वस्त्यांना एकाच प्रभागात कोंबण्यात आल्याने काँग्रेस नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याचे दिसून येते. दक्षिण नागपूरमधील प्रभाग क्रमांक ३३मधील रेशीमबागला उंटखाना, सिरसपेठ, चंदननगरला जोडण्यात आले आहे. प्रभाग ३१मध्ये जुनी शुक्रवारी, गणेशनगर, शिवनगर, आनंदनगर, प्रभाग ३४ मध्ये रामबाग, इमामवाडा, गणेशपेठ या वस्त्या काँग्रेसला फायदेशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे, गुडधेंचे वर्चस्व..

ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधील आपला शिवणगावचा पट्टा काँग्रेसकडे राखून ठेवला होता. तो यावेळीसुद्धा कायम राहणार असल्याचे दिसून येते. दुसरीकडे दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत विकास ठाकरे यांना महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. यंदा मात्र नव्या रचनेमुळे येथे परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचा गड समजला जात असलेल्या कामगारनगरला त्यांच्या जुन्या प्रभागात जोडल्या गेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com