Buldhana News : भाजप नेत्याच्या पतीने संपवलं जीवन; सुसाईट नोटमध्ये माजी आमदारावर गंभीर आरोप

अकोला शहरातील भाजपच्या नेत्या नयना मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Avinash Manatkar
Avinash Manatkar Sarkarnama

Buldhana News : अकोला शहरातील भाजपच्या नेत्या नयना मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या अजनी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे.

अविनाश मनतकर हे तेल्हारा शहरातील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. त्यांचा तेल्हारा येथे पेट्रोल पंपही होता. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणात मनतकर दाम्पत्यावर आरोप झाल्यानंतर ते प्रचंड तणावाखाली होते. या प्रकरणी गुरुवारी दुपारी मनतकर दाम्पत्य न्यायालयीन कामकाजासंदर्भात नागपुरात गेले होते.

Avinash Manatkar
Shivsena Symbol : शिंदे गटांचं आता 'सोशल मीडिया स्ट्राईक' : 'धनुष्यबाण' मिळताच नेत्यांनी बदलले फोटो!

दुपारच्या सुमारास अविनाश यांनी पत्नीसह शेगावला जाणार असल्याचे सांगितले. यानंतर थोड्या वेळातच परत येतो, असे सांगून ते ई-रिक्षात बसून निघून गेले. मात्र रात्र होऊनही ते परतले नाहीत. त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता. यामुळे नयना मनतकर यांनी अविनाश बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.

नातेवाईक शोध घेत असतानाच मनतकर यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. मनतकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 'सुसाईड नोट' लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार आणि मलकापूर अर्बन बँकेचे चेअरमन चैनसुख संचेती यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचा आरोप मनतकर यांनी केला आहे.

चैनसुख संचेती हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा मतदारसंघातून भाजपचे सहा वेळा आमदार होते. 'सुसाईड नोट'मध्ये मनतकर यांनी संचेती आणि लखानी यांच्यावर 'मलकापूर अर्बन बँके'च्या भ्रष्टाचारात आमच्या पती-पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच या प्रकरणाचा तपास करणारे अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस ठाण्याचे एसएचओ किशोर शेळके यांनी ३८ लाख रुपयांची खंडणी देऊनही त्यांनी आपल्याला मदत केली नसल्याचे मनतकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी संपूर्ण संचालक मंडळाच्या चौकशीचीही मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in