भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांना पितृशोक : कुटुंबियांवर शोककळा

Sudhir Mungantiwar | BJP | RSS : नागपूरमध्ये घेतला अखेरचा श्वास
भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांना पितृशोक : कुटुंबियांवर शोककळा

चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आणि भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना पितृशोक झाला आहे. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे आज नागपूरमध्ये निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्यानंतर डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्यावर नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात सुरू होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूक होती. सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होतं. याशिवाय त्यांच्या पश्चात मुलगी- जावई व मोठा आप्तपरिवार आहे. (Sudhir Mungantiwar's Father Dr. Sacchidanand Mungantiwar died)

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे चंद्रपूर व विदर्भातील जुन्या पिढीतील प्रख्यात वैद्यक व्यवसायी म्हणून ओळखले जात होते. ते बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यामुळे शहर-जिल्हा व विभाग स्तरावरील संघाची विविध पदे सांभाळली. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्‍यांनी समर्थपणे सांभाळल्‍या.

याशिवाय डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी १९६७ मध्‍ये भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूरमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. वयाच्या उत्तरार्धात देखील संघाशी निगडित शेकडो सेवाकार्यासाठी त्यांनी सतत केला प्रवास. त्‍यांचे पार्थिव शनिवार, ४ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यानंतर सायंकाळी ४.३० वाजता कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून अंत्‍ययात्रा निघेल आणि शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in