...अशा पद्धतीने दुहेरी घातक राजकारण करण्याचा प्रयत्न; भाजपचा शिवसेनेवर पलटवार

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, असे वृत्त आहे.
Girish Vyas
Girish Vyassarkarnama

नागपूर : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) फोन केल्याची माहिती मिळत आहे. बंडखोर आमदार परत येणार नाहीत, अशी खात्री पटल्यामुळे ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता. "मी सगळी शिवसेना (Shivsena) घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण शिंदेंना सोडा, अशी ऑफर त्यांनी दिल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. यावर भाजप (BJP) नेते गिरीश व्यास (Girish Vyas) यांनी टीका केली आहे.

व्यास म्हणाले, 2019 च्या निवडणुकीनंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ते म्हणाले होते की मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाणी सांगितले होते. मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो अडीच वर्ष तुम्ही अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री राहिल. मात्र, याचा वारंवार जाहीर सभेमधून अमित शहा यांनी निषेध नोंदवला होता, असेही व्यास यांनी सांगितले.

Girish Vyas
यवतमाळमध्येही शिवसेनेला धक्का : खासदार भावना गवळींचे समर्थक गेले शिंदे गटात

मुख्यमंत्री पदाबाबत कुठेही चर्चा झाली नाही, उद्धवजी ठाकरे आहे, आणि दुसरे संजयजी राऊत हे दोघेही नेते सातत्याने खोटे बोलतात. स्वतःची प्रतिमा वाचवण्याच्या प्रयत्न करतात. मात्र, त्यांना यामध्ये यश येणार नाही. विशिष्ट यामध्ये त्यांनी स्वतः आणि देवेंद्र फडणवीस याचे उत्तर द्यायला पाहिजे कारण त्यांच्या नावाने पेरलेली ही बातमी आहे, असा कुठलाही प्रस्ताव आला असता तर फडणवीस यांनी वाच्यता केली असती, असेही व्यास म्हणाले.

किंबहुना त्यांच्या दोघांमधले संभाषण काय झाले, आम्हाला कुणालाही माहिती नाही, त्यामुळे केवळ वावळी उचकवायची, स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीने हे दुहेरी घातक राजकारण करण्याचा प्रयत्न हे जे करतात आहेत हे सत्ता गमावलेले, संघटन गमावलेले नेते आहेत, यांच्या बद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही, अशी टीका व्यास यांनी केली.

Girish Vyas
जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय चुकीचा; खडसेंनी सांगितला भाजपमधला अनुभव

नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरेंनी फडवीसांना फोन केला होता, असे वृत्त 'साम' वाहिनीने दिले आहे. पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. आता ही वेळ निघून गेली आहे, उशीर झाला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले होते, असेही या वृत्तात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in