Anil Bonde
Anil BondeSarkarnama

भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा...

वरूड तालुक्यातील श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित असल्याची माहिती तत्कालीन भाजप नेते आमदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांना मिळाली होती.

अमरावती : भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा साधा कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सप्टेंबर 2016 मध्ये वरुडचे नायब तहसीलदार यांच्यासोबत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा वरुड पोलीस स्टेशनमध्ये डॉ. बोंडेंवर दाखल झाला होता. आज त्याचा निकाल आला. ज्यामध्ये ही शिक्षा सुनावली गेली आहे.

यावेळी डॉ. बोंडे (Anil Bonde) यांना जामीनदेखील मंजूर करण्यात आला. या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागणार असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित असल्याची माहिती तत्कालीन भाजप नेते आमदार अनिल बोंडे यांना मिळाली होती. तीन महिन्यांपासून क्षुल्लक त्रुटी काढून लाभार्थ्यांना त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी बोंडे यांच्याकडे आल्या होत्या. यामुळे योजनेची वस्तुस्थिती समजून घेण्याकरिता ते वरूड तहसील कार्यालयात गेले होते.

दोन्ही योजनांचे काम नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांच्याकडेच असल्याने बोंडे यांनी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. या दरम्यान 240 हुन अधिक प्रकरणांमध्ये त्रुटी काढण्यात आली असल्याची माहिती समोर आली. त्यावर काळे यांनी, लाभार्थ्यांना योजनेच्या कागदपत्रांसोबत पाच रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक असल्याचे बोंडे यांना सांगितले. त्यामुळे अनिल बोंडे आणि नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमक उडाल्यानंतर बोंडे यांनी काळे यांना मारहाण केली, अशी तक्रार नोंदवण्यात आली. उपस्थित कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी हा वाद शमविला.

Anil Bonde
तुमचा मुलगा अमेरिकेत, आम्हाला बोलवा दंगलीच्या केस अंगावर घ्यायला : भाजपचे अनिल बोंडे झाले ट्रोल

मारहाणीच्या प्रकारामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी चांगलेच संतापले. त्यांनी तातडीने वरूड पोलिस ठाणे गाठून तत्कालीन आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्याविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून आमदार अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा कलम - 353, 332, 504 आणि 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. अडकड यांनी डॉ. अनिल बोंडे यांना कलम 332 अंतर्गत तीन महिन्यांचा साधा कारावास आणि 10 हजार रुपये दंड तसेच कलम 504 अंतर्गत तीन महिने साधा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.

वसुधा बोंडेंनी घेतला जामीन..

माजी आमदार अनिल बोंडे यांच्या पत्नी वसुधा बोंडे यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला व न्यायालयाने अनिल बोंडे यांना १ लाख रुपयांच्या जामिनावर लगेच मुक्त केले. या प्रकरणात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com