फडणवीसांचा हल्लाबोल, हे दारू विकणाऱ्यांचे सरकार..

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक (Local Body Election) प्रचारासाठी आज भंडारा दौऱ्यावर आहेत.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

sarkarnama

भंडारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते आज (ता.19 डिसेंबर) भंडारा येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक (Local Body Election) प्रचारासाठी आले होते. यावेळी कलेल्या प्रचार सभेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis</p></div>
`परब यांच्या बेकायदा बांधकामाची माहिती रामदास कदमांनी नाही तर मी दिली होती`

फडणवीस म्हणाले, कोरोना संकटकाळात सामान्य जनतेला महाविकास आघाडी सरकारने एक रुपयांची मदत केली नाही. मात्र, लॉकडाऊन शिथील होताच सर्व बार मालक शरद पवारांकडे गेले व मदतीची मागणी केली यावर त्यांनी दारू विक्रेत्यांना लायसन्स फीमध्ये कपात करून मदत केली. ते एवढ्यावरच न थांबता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारूवर 50 टक्के कर कमी करण्याच्या निर्णय या सरकारने घेतला. त्यामुळे हे गरीबांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार असल्याच्या घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis</p></div>
`भाजपचा तो नेता एक नंबरचा दलाल.. त्याची दलाली मी बुडविणार!`

भाजप सरकारने सरू केलेली बोनस प्रक्रिया या सरकारला पुढे चालवता आली नाही. नाना पटोले हे रोज संविधान खतरे मे है म्हणतात. मात्र, धान्य उत्पादक़ शेतकरी संकटात असतांना नाना बोलत नाही, अशी खोचक टीका कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंवर फडणवीसांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांची विज कापत असून आम्ही 5 वर्षात एकदाही विज कापली नसल्याचीही आठवण त्यांनी सरकारला करून दिली.

फडणवीस म्हणाले, ओबीसीचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप या सरकारने केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती 14 महिन्याच्या काळात सुद्धा या सरकारला पुरवता आली नाही. हे सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नाही. या सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबरोबरच सरकरमधील 50 टक्के मंत्री हे ओबीसी विरोधात लढतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय भाजप सरकारच्या काळात हलबा समाजाला संरक्षण दिले गेले होते. मात्र, या रकारने हलबा समाजाला संरक्षण न दिल्याने हलबा समाजबांधवाना आज 11 महिन्याच्या करारावर आज नोकरी करावी लागत आहे. तसेच आता माध्यामांकडूनही सरकार शोधा बक्षीस मिळवा अशी टीका होत असल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com