तुमचा मुलगा अमेरिकेत, आम्हाला बोलवा दंगलीच्या केस अंगावर घ्यायला : भाजपचे अनिल बोंडे झाले ट्रोल

नेत्यांची लेकर बाळ परदेशात शिकून स्थायिक होऊन पैसे कमवतात!
तुमचा मुलगा अमेरिकेत, आम्हाला बोलवा दंगलीच्या केस अंगावर घ्यायला : भाजपचे अनिल बोंडे झाले ट्रोल
Anil Bondesarkarnama

अमरावती : भाजपचे (BJP) नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) अमरावती हिंसाचारानंतर सोशल मीडियावर (Social media) चांगलेच ट्रोल झाले आहेत. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. बोंडे यांच्या एका ट्वीटवरुन नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच तुम्ही तुमच्या मुलाला अमेरिकेत पाठवले आणि इथल्या तरुणांची माथी भडकवत आहात, असा आरोप केला. तुमचा मुलगा परदेशात शिकायला आणि दंगलीच्या केसेस घ्यायला बिचारे सामान्य गरीब कार्यकर्ते, असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Anil Bonde
अमरावती पोलिस आयुक्तांनी शहरात लागू केली संचारबंदी...

याच संदर्भात आनंद शितोळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणाले, दंगलीत नेमकी कुणाची डोकी फुटतात, कुणाच्या अंगावर खटले पडतात, कोण कोर्टाच्या खेट्या मारत आणि चिथावणीखोर नेत्यांची लेकर बाळ परदेशात शिकून स्थायिक होऊन पैसे कमवतात याच प्रत्यक्ष उदाहरण आणि पुरावा. फडणवीस सरकारमध्ये कधीकाळी मंत्री असलेले हे डॉक्टर अनिल बोंडे. यांच पहिले ट्वीट आहे २२ एप्रिल २०२१. अनिल बोंडे यांचा डॉक्टर मुलगा कुणाल यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी शेअर केलेले आहेत. लग्न रामनवमीच्या मुहूर्तावर लागल. कुठे? तर अमेरिकेत मिनिसोटा मधल्या हिंदू मंदिरात. डॉक्टर अनिल बोंडे यांचा मुलगाही डॉक्टर आहे आणि लग्न अमेरिकेत करतोय म्हणजे अमेरिकेत शिकून स्थायिक झालेला असेल.

Anil Bonde
...हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही?

बोंडे यांच दुसर ट्वीट आहे १२ नोव्हेबर २०२१. ''उद्या अमरावती बंद झालच पाहिजे, मी उद्या सकाळी ९. ३० वाजता राजकमल चौकात येतोय तुम्हीही या''. अस आवाहन त्यांनी केलेले आहे. तुमची लेकर अमेरिकेत शिकून डॉक्टर होऊन तिकड लग्न वगैरे करणार आणि तुम्ही इथल्या स्थानिक तरुणांना अमरावती बंद करायला भडकवणार. हे सगळे उद्योग पोलिसांनी बंद केलेले आहेत, मनाई आहे तरीही तुम्हाला गर्दी जमवायची आहे आणि लोकांवर खटले दाखल करायचे आहेत का, असा सवाल शितोळे यांनी केला आहे. बर तुमच्यावर खटले दाखल झाले तरीही आमदार म्हणून तुम्ही त्यातून बाहेर पडणार, उद्या सरकार आल कि तुमच्यावर असणारे खटले राजकीय म्हणून काढून टाकणार आणि गरिबांची पोर? त्यांनी कोर्टात चकरा मारायच्या आणि झिजून मरायचे?

खाजगी नोकरीत सुद्धा पोलिस व्हेरिफिकेशन लागत, तिथे पोलिसांनी दंगलीचा गुन्हा नावावर आहे म्हणून लिहून दिल कि पोरांनी काय करायचे? चहाची टपरी, वडापाव गाडी कि तुमच्या मोर्चात रोजाने झेंडे फडकवत फिरायचे? सामान्य मुलांनी शिकूच नये का? चांगल्या नोकऱ्या करूच नयेत का? तुम्हाला हे असले बंद करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात वाचनालय, अभ्यासिका, नोकरी मार्गदर्शन केंद्र, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरु करावस वाटत नाही? इंग्रजी बोलण्याच्या कार्यशाळा घेऊ वाटत नाहीत? मग पोर शिकली आणि रांगेला लागली तर हि डोके फोडायची दंगल करायला सैन्य कुठून येणार ना, अशा प्रश्वांची शरबत्तीच शितोळे यांनी केली आहे. हिंदू मुस्लीम असोत कि अन्य कुठलेही धर्मीय असोत. लोकहो, आपल्याला भडकवून आपलीच डोकी फोडणारी हि लोक ओळखून यांच्यापासून चार कोस लांब राहण्यात आपल हित आहे, असेही शितोळे यांनी म्हटले आहे. आपण नीट शिकलो, नीट कामधंदा केला आणि आईबापाला नीट सांभाळून घर चार पावल पुढ नेल कि तोच खरा धर्म सांभाळून वाढवला, बाकी सगळ झूट, असेही ते म्हणाले.

शितोळे यांच्या प्रमानेच अनेकांनी बोंडे यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये जो खरा हिंदू आहे त्याला कोणत्या अनिल बोंडेंची गरज नाही आणि हिंदू धर्म कधी धोक्यात आलाय हे तर भाजपने सांगूच नये. ' हिंदू खत्रे मे है ' बोलून लोकांची डोकी फोडून राजकारण करणे म्हणजे भाजपचा हिंदूत्व आणि भाजपच हिंदुत्व भाजपला आणि त्यांच्या माणसांना लाभो, असेही एकाने म्हटले आहे.

बोंडे यांचा मुलगा परदेशात शिकायला आणि दंगलीच्या केसेस घ्यायला बिचारे सामान्य गरीब कार्यकर्ते, असे म्हणत एकाने बोंडे यांच्यावर प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या स्टाईलमध्ये टीका केली. दुसऱ्या एकाने डॉ. कुणाल कधी येणार आहे रस्त्यांवर दुसर्‍यांची दुकाने जाळायला आणि केसेस अंगावर घ्यायला. असे म्हटले आहे. अशा अनेक प्रतिक्रिया बोंडे यांच्या विरोधात व्यक्त होत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in