BJPने घेतली पदवीधरच्या पुनरावृत्तीची धास्ती, उमेदवार बदलविण्याला विरोध !

Teachers Constituency : भाजपने यासंदर्भात बैठक घेतली. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही.
Nagpur Teachers Constituency Election
Nagpur Teachers Constituency ElectionSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या मतदारसंघातून १२ वर्ष आमदार राहिलेले नागो गाणार यांचे नाव निश्‍चित केले आहे. पण भाजपने मात्र अद्याप पत्ते ओपन केलेले नाही. काल भाजपने यासंदर्भात बैठक घेतली. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही.

नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपला (BJP) अस्मान दाखविले होते. या निवडणुकीत कॉंग्रेसचे (Congress)अभिजित वंजारी मोठ्या फरकाने निवडून आले. त्याच निवडणुकीची पुनरावृत्ती शिक्षक मतदारसंघात होऊ नये, म्हणून भाजप एक-एक पाऊल फुंकून फुंकून टाकत आहे. पण उमेदवाराची घोषणा करायला जेवढा वेळ लागेल, तेवढी रिस्क वाढणार असल्याचे भाजपच्या काही आमदारांचे म्हणणे आहे आणि जर का उमेदवार बदलवण्याचा प्रयत्न केला, तर मोठा धोका होऊ शकतो, असे बैठकीत काहींनी सांगितल्याची माहिती आहे.

शिक्षक आमदार निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी तातडीची बैठक घेऊन आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. मात्र उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. पदवीधर निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये याची खरबरदारी पक्षातर्फे घेतली जात असल्याने नागोराव गाणार हेच उमेदवार राहतील असा तर्क लावला जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मराठवाड्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा महिनाभरापूर्वी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असतानाही नागपूर विभागाच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित करण्यात आले नाही. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने माजी आमदार नागोराव गाणार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संघटनेने ठराव करून भाजपला समर्थनासाठी पत्र दिले आहे. गाणार दोन वेळा आमदार होते. त्यामुळे आता दुसऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी भाजपातून केली जात आहे. असे असले तरी भाजपच्या नेतृत्वाने अद्याप कोणालाही शब्द दिला नाही. तसेच गाणार यांनासुद्धा नकार दिला नाही.

Nagpur Teachers Constituency Election
Teachers Constituency Election : शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राजकीय पक्ष अजूनही विचारात !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपला दौरा सोडून तातडीने बैठकीसाठी आज नागपूरला आले होते. त्यामुळे आजच उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. कोणाला उमेदवारी द्यायची अशी विचारणा केल्याचे समजते. बैठकीत एका आमदाराने मात्र दुसऱ्या कोणाला संधी द्यायची होती तर त्याला आधीच तयारीला लावायचे होते असे मत मांडले. ऐनवेळी उमेदवार बदलण्यात धोका आहे. केव्हाही घात होऊ शकतो असा धोक्याचा इशारासुद्धा दिला. यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष वेधल्याचे समजते.

मोहन मते निवडणूक प्रमुख..

शिक्षक आमदार निवडणुकीसाठी नागपूर विभागाचे निवडणूक प्रमुख म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार आणि नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त मोहन मते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in