TET Scam : असा विरोधी पक्ष पाहिला नाही ; फडणवीसांचा अजितदादांना टोला

TET Scam : फडणवीसांनी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची आठवण करुन दिली.
Devendra Fadnavis ajit Pawar
Devendra Fadnavis ajit Pawar

TET Scam : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. गायरान जमीन, टीईटी (TET Scam) गैरव्यवहारावरुन सत्तारांना विरोधकांनी धारेवर धरलं आहे.

जमीन गैरव्यवहारावर सत्तारांनी आज (बुधवारी) स्पष्टीकरण दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी टीईटी गैरव्यवहारात अब्दुल सत्तार यांच्यावर झालेले आरोप खोडून काढत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. (TET Scam news update)

अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलींना नोकरी लावण्यासाठी टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा वापर करून घेतल्याचा आरोप आहे. या आरोपावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. यावेळी फडणवीसांनी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची आठवण करुन दिली.

लवंगी फटाकडी सुद्धा यांना सापडत नाही..

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा पहिला विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातील गोष्टीच भ्रष्टाचार म्हणून बाहेर काढत आहे.अपात्र कंपनींना पात्र करुन टीईटी परिक्षा कोणी घेतली, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. "बॉम्ब-बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाकडी सुद्धा यांना सापडत नाही आहे," असा टोला त्यांनी लगावला. सत्तार यांच्या मुली या पात्रता परीक्षेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत त्यांना नोकरी लागलेली नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis ajit Pawar
Winter Session : अण्णा हजारेंची 'ती' मागणी शिंदे-फडणवीसांनी पूर्ण केली..

“टीईटी घोटाळा हा महाविकास आघाडीच्या काळात झाला, महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यातील लाखो तरुणांना बुडवणारा टीईटी घोटाळा झाला. सनदी अधिकाऱ्यापासून सर्व लोक टीईटी घोटाळ्यात सामील होते. टीईटी घोटाळ्याप्रकरणी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अटकही झाली,” याची आठवण फडणवीसांनी विरोधकांना दिली.

आरोप केल्यानंतर काही आमदार सभात्याग करतात, यावर देवेंद्र फडणवीस संतापले, ते म्हणाले, "टीईटी घोटाळ्यावरून अब्दुल सत्तारांवर आरोप करण्यात येत आहे. पण, त्यांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागली नाही. टीईटी आयुक्तांनी तसा खुलासा केला आहे. पण, कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करून निघून जायचं. मात्र, आम्ही सोडणार नाही, तसेच उत्तर देऊ,”

Devendra Fadnavis ajit Pawar
Abdul Sattar : गायरान जमीन घोटाळ्यावर अखेर सत्तारांनी दिले स्पष्टीकरण..; म्हणाले..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत 'नागपूरचे संत्री, भ्रष्टाचारी मंत्री', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. यावेळी आमदारांच्या हातात संत्रीही होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहीत पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com