Amravati Graduate Election : रणजीत पाटलांचा 'दोन' आकड्याने केला मोठा घात; नेमके काय घडले...

Dheeraj Lingade, Ranjit Patil News : अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडे यांनी दणदणीत विजय मिळवला
Dheeraj Lingade, Ranjit Patil News
Dheeraj Lingade, Ranjit Patil NewsSarkarnama

Legislative Council Election Results : राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये तीन शिक्षक मतदार संघ आणि दोन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चमकदार कामगिरी करत तीन जागा निवडून आणल्या आहेत. या सर्वाधीक काळ मतमोजणी चालली ती अमरावतीमध्ये मतदार संघात.

अमरावतीमध्ये भाजपच्या (BJP) सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या नियोजनानुसारच घडल्या. मात्र, '2' या आकड्याने डॉ. रणजीत पाटील (Ranjit Patil) यांचा घात केल्याची चर्चा आहे. अमरावतीमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत काट्याची टक्कर झाली. मतमोजणीच्या पहिल्या तासापासूनच कधी रणजीत पाटील तर कधी धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) पुढे जात होते. दुसरी फेरी सुरु असताना पाटील यांना 41 हजार 260 मते मिळाली होती, तर लिंगाडे यांना 43 हजार 632 मते पडली होती.

Dheeraj Lingade, Ranjit Patil News
Congress News : काँग्रेसचा एक उमेदवार गेला; पण दोन मतदार संघ आणले खेचून : भाजपचे चाणक्य फेल

मात्र, यात बाद मतांची संख्या लक्षणीय ठरली. अमरावतीमध्ये तब्बल 8 हजार 735 मते बाद झाली. मिळालेल्या माहितीनुसार याच बाद ठरलेल्या 8 हजार 735 मतांमध्ये जवळपास पाच हजारांच्या जवळपास मत ही रणजीत पाटील यांची होती, अशे सूत्रांनी सांगितले. या मतपत्रिकांवर केवळ '2' हा आकडा लिहिला होता. या मतपत्रिकांवर '1' असा पसंतीक्रम कोणाच्याही नावापुढे नव्हता. त्यामुळे या मतपत्रिका नियमाप्रमाणे बाद ठरवण्यात आल्या. त्यामुळे पाटील यांना मोठा धक्का बसला.

अमरावतीमध्ये (Amravati) यंदा जवळपास 6 हजार नवीन मतदारांची नोंदणी केली होती. याच मतदारांनी पाटील यांच्या विजयाचे गणित बिघडवल्याची चर्चा आहे. नवीन मतदार नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या पेन्शन धारकांची संख्या लक्षणीय होती. अनेक कर्मचाऱ्यांनी यावेळी मतदार नोंदणी करुन घेतली होती. त्या सर्वांनी रणजीत पाटील यांना धक्का दिल्याची चर्चा आहे.

Dheeraj Lingade, Ranjit Patil News
Amravati Graduate Election : रणजीत पाटलांनी धुळीस मिळवली देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा !

दरम्यान, पाटील यांच्या नावापुढे '1' असा पसंतीक्रम न लिहिता थेट '2' हा आकडा लिहिला. त्यामुळे 8 हजार 735 मतपत्रिका बाद ठरल्या, ठरल्याचे सांगितेल जात आहे. या 8 हजार 735 बाद मतांच्या फेर तपासणीसाठी पाटील यांनी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज मान्य करत निवडणूक निर्णय अधिकारी फेर मतमोजणी केली. मात्र, यामध्ये लिंगाडे यांना 177 मत मिळाली. तर पाटील यांना 145 मत मिळाली. त्यामुळे पाटील यांनाचा पराभव दोन आकड्याने केल्याची चर्चा मतदार संघात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com