भाजपने शिवसेना फोडली; आता विदर्भ-मराठवाड्यात कॉंग्रेसला पाडणार भगदाड ?

विदर्भ (Vidrabha) आणि मराठवाड्यातील कॉंग्रेसचे (Congress) नेते भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
Devendra Fadanvis between BJP and congress
Devendra Fadanvis between BJP and congressSarkarnama

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे वादळ आले. शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. भाजपने पद्धतशीरपणे शिवसेना फोडल्याच्या चर्चा अजूनही रंगताहेत. आता भाजपने कॉंग्रेसला भगदाड पाडण्याची तयारी चालवली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

विदर्भ (Vidrabha) आणि मराठवाड्यातील कॉंग्रेसचे (Congress) नेते भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील (Marathawada) १० ते १२ आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याचेही सूत्र सांगतात. गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विदर्भाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ मार्गे नांदेड गाठले होते. तेथे मराठवाड्यातील कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्यासोबत त्यांची बंदद्वार चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे सूत्रांच्या या माहितीला बळ मिळते.

अब्दुल सत्तारांच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले. अब्दुल सत्तारांनी नांदेडमधील आढावा बैठक संपताच ‘त्या’ नेत्याचे घर गाठले होते. जवळपास अर्धा तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. तेथे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा प्रवेश नव्हता. त्यामुळे बैठकीत नेमकी चर्चा काय झाली, याची माहिती मिळू शकली नाही. पण त्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार आणि त्या कॉंग्रेस नेत्यांनी ‘ही भेट म्हणजे केवळ शिष्टाचार होता’, अशा प्रतिक्रिया दिल्या. पण या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे सूत्र सांगतात.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी चर्चा गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू झाली होती. पण कॉंग्रेसचा एक गट फुटणार, या चर्चेने वेग पकडल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडणार असल्याचेही सांगण्यात येते. सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारचे भवितव्य काय, यावरही राजकीय जाणकारांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे मंत्री पूर्ण आत्मविश्‍वासाने काम करीत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील मंत्री बनलेल्या नेत्यांमधील आत्मविश्‍वास कमी दिसत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. याची कुणकूण भाजप नेत्यांना लागल्यामुळेच त्यांनी कॉंग्रेसला भगदाड पाडण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्र सांगतात. कॉंग्रेसचे विदर्भ आणि मराठवाड्यातील १० ते १२ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे.

Devendra Fadanvis between BJP and congress
काॅंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरेंकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत ; भाजपमध्ये लवकरच मोठे प्रवेश..

अमित शहांच्या उपस्थितीत होऊ शकतो प्रवेश..

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या ५ सप्टेंबरला मुंबईत लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती आहे. त्यातच कॉंग्रेसचे आमदार फुटणार, या चर्चांनी जोर पकडला आहे. त्यामुळे अमित शहांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे फुटीर आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील की काय, अशी एक शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com